Mazi Ladki Bahin Yojana  Agrowon
ॲग्रो विशेष

Majhi Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’साठी आधार कार्ड लिंक बॅंक खाते नंबर द्या’

Ladki Bahin Scheme : ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थ्यांचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने नोंदविताना लाभार्थ्यांच्या आधारकार्डवर लाभार्थ्यांचे नमूद नाव जसेच्या तसे नारी शक्ती ॲपवर नोंदविणे आवश्यक आहे.

Team Agrowon

Nashik News : ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थ्यांचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने नोंदविताना लाभार्थ्यांच्या आधारकार्डवर लाभार्थ्यांचे नमूद नाव जसेच्या तसे नारी शक्ती ॲपवर नोंदविणे आवश्यक आहे. तसेच बँकखाते क्रमांक लाभार्थ्यांच्या आधारकार्डला लिंक असणे आवश्यक आहे.

या बाबींची खात्री झाल्यानंतरच लाभार्थ्याचे नाव व बँक खाते क्रमांक नारीशक्ती ॲपवर नोंदविण्यात यावे असे आवाहन जिल्हा परिषदेतील महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी मनोज ससे यांनी केले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी शहरी व ग्रामीण भागामध्ये अधिकाधिक शिबिरांचे आयोजन करून लाभार्थ्यांकडून ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरून घेण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

योजनेचे अर्ज भरून घेताना लाभार्थ्यांच्या आधारकार्डावर नमूद असलेले नाव तसेच आधारकार्डला लिंक असलेल्या बँक खात्याची माहिती नारीशक्ती ॲपवर अचूकपणे नोंदविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिल्या आहेत.

नवविवाहित महिलेचे नाव लगेच रेशनकार्डवर लावणे शक्य होत नसल्याने विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या विवाहित महिलेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तसेच, या योजनेच्या लाभासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT