Ginger Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Ginger Farming: सातारा जिल्ह्यात आले लागवड सुरु

Ginger Cultivation Issue: सातारा जिल्ह्यात १३ मे पासून सुरू झालेल्या पावसामुळे आले पिकाची लागवड रखडली होती. मात्र पाच दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने जिल्ह्यात दाटक्या घातीवर आले लागवडीस प्रारंभ झाला आहे.

Team Agrowon

Satara News: सातारा जिल्ह्यात १३ मे पासून सुरू झालेल्या पावसामुळे आले पिकाची लागवड रखडली होती. मात्र पाच दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने जिल्ह्यात दाटक्या घातीवर आले लागवडीस प्रारंभ झाला आहे. दरात मोठ्या प्रमाणात झालेली घसरण व झालेला अतिरिक्त पाऊस यामुळे या हंगामात आले पिकाच्या दरात घट होण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

जिल्ह्यात नगदी पिकापैकी आले हे प्रमुख पीक आहे. जिल्ह्यात अडीच ते तीन हजार हेक्टरवर आले पिकाचे सरासरी क्षेत्र आहे. बाजारपेठेत सातारी आल्याची स्वंतत्र ओळख आहे. गेल्या चार वर्षांत आले पिकाच्या दराने विक्रम केले होते. मात्र यावर्षी आले पिकाच्या दराने नीचांक गाठला आहे. दरातील घसरणीमुळे आले पीक खरेदीचा बोजबारा उडाला आहे.

व्यापाऱ्यांकडून खरेदी होत नसल्याने शेतकऱ्यांत चिंता निर्माण झाली आहे. दराच्या संकटात आता अतिपवासाने शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. अक्षय तृतीया किंवा मेच्या दुसऱ्या आठवड्यापासून (तापमान व पाणी परिस्थिती) पाहून आले लागवड सुरू होते. मात्र याच काळात मॉन्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. मेच्या अखेरीस सलग सात दिवस मुसळधार पाऊस झाल्याने शेतात पाणी पाणी झाले होते. याचा परिणाम आले लागवडीवर झाला आहे.

सुरुवातीचा लागवडी काळ गेला असून सध्या पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांची दाटक्या घातीवर आले लागवड सुरू केली आहे. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने अद्याप अपेक्षित घात आलेली नाही. तसेच अनेक शेतकऱ्यांची मशागतीची कामे झालेली नाहीत. यामुळे जूनच्या अखेरपर्यंत लागवड सुरू राहण्याचा अंदाज आहे. किमान उद्याप चार ते पाच दिवस पाऊस न झाल्यास लागवडीस गती येणार आहे.

मात्र पुढील चार ते पाच दिवसांत मॉन्सून सक्रिय झाल्यास आले लागवड रखडणार आहे. दरामुळे नाराज असलेले शेतकरी त्यात अति पावसामुळे आले पिकाबाबत निराशा दिसून येत आहे. दर कमी जास्त झाले पीक टिकवण्याच्या दृष्टीने, बियाण्यासाठी कमी का होईना शेतकरी आले लागवड करतात. बियाणे कमी खरेदी झाल्याने या हंगामात आले पिकांच्या क्षेत्रात किमान ३० टक्के घट होण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Machinery Bank: कृषी अवजारे बँकेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज

Fishing Season 2026: मासेमारीला ७६ दिवसांनी प्रारंभ

Tree Plantation Record: धाराशिवला बारा तासांत १० लाख रोपांची लागवड; जिल्हा प्रशासनाचा सलग दुसऱ्या वर्षी विश्वविक्रम

Grazing Land Rights: चराई क्षेत्र निश्‍चित करून पशुपालकांवरील कारवाई थांबवा; खासदार नीलेश लंके यांची केंद्र सरकारकडे मागणी

Agri Export: शेतीमाल निर्यातीसाठी ‘ग्रीन चॅनेल’

SCROLL FOR NEXT