Rural Education Agrowon
ॲग्रो विशेष

School Geo Tagging : सातारा जिल्ह्यातील शाळांचे होणार जिओ टॅगिंग

Rural Education : सर्व शाळांची भौतिक ठिकाणांसह त्यांची सर्व छायाचित्रे आणि माहिती एकत्र गोळा व्हावी यासाठी आता शाळांचे जिओ टॅगिंग करण्यात येणार आहे.

हेमंत पवार

Karad News : सर्व शाळांची भौतिक ठिकाणांसह त्यांची सर्व छायाचित्रे आणि माहिती एकत्र गोळा व्हावी यासाठी आता शाळांचे जिओ टॅगिंग करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत सातारा जिल्ह्यातील पहिली ते १२ वीपर्यंतच्या तीन हजार ८१५ शाळांचे जिओ टॅगिंग करण्यात येणार आहे.

त्यासाठी सरकारने एक अॅप तयार करून दिले असून त्यावर माहिती अपलोड केल्यावर शिक्षण खात्याला शाळांची सर्व माहिती तत्काळ मिळण्यास मदत होणार आहे. माहिती अपलोड करण्यासाठी ३० एप्रिलची डेडलाईन देण्यात आली आहे.

शिक्षण खात्याकडे शाळेचे गाव, ती कोणत्या वाडी-वस्ती कोठे आहे, त्या शाळेच्या परिसतील लोकसंख्येची घनता किती आहे, दोन शाळांतील अंतर, शाळेच्या जवळील राज्य-जिल्हा मार्ग, महामार्ग कोणता आहे, शाळांच्या जवळ शासनाच्या इतर कोणत्या विभागांची सेवा उपलब्ध आहे याची माहितीच उपलब्ध नव्हती. ती गैरसोय दुर व्हावी यासाठी शाळांचे जिओ टॅगिंग करण्यात येणार आहे.

शाळांनी कशी भरावी माहिती ?

शाळांना ‘महा स्कूल जीआयएस’ नावाचे ॲप दिले गेले आहे. ते अॅप डाउनलोड करून त्यात माहिती भरणे बंधनकारक असेल. माहिती भरताना शाळांत उपलब्ध असलेल्या सर्व भौतिक ठिकाणांच्या छायाचित्रांसह ती माहिती टॅग करून शाळेचे जीआयएस लोकेशन निश्चित करावे. त्यामध्ये शाळेचे नाव, इमारत, किचन शेड, स्वच्छतागृह सुविधा, पिण्याच्या पाण्याच्या सुव‍िधा अशी पाच छायाचित्रे समाविष्ट करून ती माहिती महा स्कूल जीआयएसमध्ये भरावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

सातारा जिल्ह्यातील शाळांची संख्या

सातारा जिल्हा परिषदेअंतर्गत शाळा २,६७०

नगरपालिकेच्या शाळा ५२

खासगी अनुदानित, इतर शाळा १९३

एकूण शाळांची संख्या ३,८१५

सातारा जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या सर्व शाळांचे जीओ टॅगिंग करण्याचे काम सुरू आहे. मुख्याध्यापकांकडुन त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- शबनम मुजावर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सातारा जिल्हा परिषद

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Bill : समर्थ कारखान्याने बिलातून खाजगी संस्थांसाठी शेतकऱ्यांचे पैसे कपात केले; आमदार हिकमत उढाण यांची लक्षवेधी, सहकारमंत्र्यांचं स्पष्ट उत्तर

Farmer Relief: चार लाखांवर शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या अनुदानाचे वितरण

Silicon Use In Maize Farming: मका उत्पादनवाढीसाठी सिलिकॉन फायदेशीर

Summer Onion Cultivation: उन्हाळी कांदा लागवडीचे सुधारित तंत्र; उत्पादन वाढवा, नुकसान कमी करा!

Nagpur Winter Session: विरोधक संपतील, पण विरोध कसा संपवाल?

SCROLL FOR NEXT