River Barrage Agrowon
ॲग्रो विशेष

Aram River Barrage : आरम नदीवरील बंधाऱ्याला दीड कोटीचा निधी मंजूर

River Water Management : सटाणा शहराजवळील मोरेनगर गावाच्या हद्दीतील आरम नदीवर बांधण्यात येणाऱ्या गेटेड सिमेंट काँक्रिट बंधाऱ्याच्या कामासाठी शासनाकडून १ कोटी ६४ लाख ९९ हजार ९४९ रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

Team Agrowon

Nashik News : सटाणा शहराजवळील मोरेनगर गावाच्या हद्दीतील आरम नदीवर बांधण्यात येणाऱ्या गेटेड सिमेंट काँक्रिट बंधाऱ्याच्या कामासाठी शासनाकडून १ कोटी ६४ लाख ९९ हजार ९४९ रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

या कामाची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून लवकरच या कामास सुरुवात होईल, अशी माहिती आमदार दिलीप मंगळू बोरसे यांनी दिली. बागलाण तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढण्यासाठी आरम, मोसम व अन्य नद्यांवर गेटेड सिमेंट काँक्रीट बंधारे बांधण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता लघू पाटबंधाऱ्याचे बांधकाम व दुरुस्ती या शीर्षकांतर्गत या बंधाऱ्यासाठी १ कोटी ६४ लाख ९९ हजार ९४९ रुपयांचा निधी मंजूर झाला.

बंधाऱ्यामुळे आरम नदी काठावरील मोरेनगर, सटाणा शहर, मळगाव व आराई शिवारातील शेकडो हेक्टर शेती सिंचनाचा थेट लाभ होणार आहे. या परिसरात असलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या विहिरींना देखील बंधाऱ्यामुळे भक्कम जलस्रोत उपलब्ध होऊन गावातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता वाढणार आहे.

यांसह सटाणा शहराला याचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. प्रशासकीय मान्यतेनंतर अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. निधीची तरतूद झाल्याने लवकरच या कामास प्रत्यक्ष सुरुवात होईल, असेही बोरसे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Employment Support: मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांना नोकरी; वनमंत्री गणेश नाईक यांची सभागृहात घोषणा

Maharashtra Assembly Session: मंत्रिपदासाठी नाही, मग कर्जमाफीसाठी निकष का?

Anna Hazare Protest: पाच जुलैपासून बेमुदत उपोषणाचा अण्णा हजारे यांचा इशारा

Onion Procurement Irregularities: कांदा खरेदीत मनमानीचा कळस

EL Nino: ‘एल निनो’चा देशातील १११ जिल्ह्यांना सर्वाधिक धोका; शिवराजसिंह चौहान

SCROLL FOR NEXT