River Barrage : भीमा, सीना नदीवरील बॅरेजेससाठी सर्वेक्षणाच्या सूचना

Radhakrishna Vikhe Patil _ गोदावरी नदीवरील बॅरेजेच्या धर्तीवर सोलापूर जिल्ह्यात भीमा व सीना नदीवर नवे बॅरेज बांधण्यासाठी सर्वेक्षण करा. त्याचा अहवाल ३० एप्रिलपर्यंत अहवाल सादर करा, अशा सूचना जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.
River Barrage
River Barrage Agrowon
Published on
Updated on

Solapur News : गोदावरी नदीवरील बॅरेजेच्या धर्तीवर सोलापूर जिल्ह्यात भीमा व सीना नदीवर नवे बॅरेज बांधण्यासाठी सर्वेक्षण करा. त्याचा अहवाल ३० एप्रिलपर्यंत अहवाल सादर करा, अशा सूचना जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. तसेच पूरसंरक्षण घाट बांधण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचेही आदेश दिले आहेत. त्यानुसार दोन्ही नद्यांवर घाट बांधण्याचे प्रस्ताव लवकरच जलसंपदा विभागाकडे प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

मुंबईत जलसंपदामंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील जलसुरक्षेसंदर्भात बैठक झाली. या बैठकीस आमदार सुभाष देशमुख, अभिजित पाटील यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत आमदार देशमुख व पाटील यांनी भीमा व सीना नदीवर बॅरेजेस बांधण्याची मागणी केली. उजनी ते हिळ्ळीपर्यंत भीमा नदीवर २४ तर सीना नदीवर एकूण ४७ बंधारे आहेत.

मात्र, ते कालबाह्य झाल्याने त्यांची गळती वाढली आहे. त्यामुळे गोदावरी नदीवरील आणि कर्नाटक सरकारने भीमा नदीवर उमराणी (ता. चडचण, जि. विजयपूर) येथे बांधलेल्या अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज बॅरेजेसच्या धर्तीवर नवे बॅरेजेस बांधण्याची गरज आहे, याकडे त्यांनी विखे पाटील यांचे लक्ष वेधले.

River Barrage
Water Barrage : ठाणे जिल्ह्यातील पाझर तलाव गाळमुक्त

त्यानंतर विखे पाटील यांनी दोन्ही नद्यांचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल ३० एप्रिलपर्यंत सादर करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. याप्रसंगी उजनी धरण परिसर पर्यटन विकासाला लवकर गती देण्यासह सुस्ते, अकोले खुर्द बुडीत बंधाऱ्यांच्या अडचणी व उपाययोजना यावरही चर्चा करण्यात आली. तसेच संरक्षक घाट बांधण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आदेश मंत्री विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार लवकरच प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी जलसंपदा मंत्र्यांकडे पाठविण्यात येणार आहे.

River Barrage
Varkhed Londhe Barrage water : वरखेड लोंढे बॅरेजचे पाणी बंदीस्त जलवाहिनीने पोचणार

या ठिकाणी पूरसंरक्षक घाट प्रस्तावित

भीमा व सीना नदीवर तेलगाव, भंडारकवठे, सादेपूर, चिंचपूर, पाकणी, तिऱ्हे, अकोले, नंदूर, पिराची कुरोली, पटवर्धन कुरोली, खेड भाळवणी, खेड भोसे, देवडे, चिंचोली, भोसे, शिरढोण, कौढाळी, देगाव, शेळगाव, अर्जुनसोंड, मुंडेवाडी येथे पूरसंरक्षक घाट बांधण्याचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.

वडापूर बॅरेज व भीमा - सीना जोडकालव्याच्या सर्वेक्षणाची निविदा लवकरच काढण्यात येणार आहे. कालव्यातून पाणी सोडून होटगी, सोरेगाव, हत्तूर, धुबधुबी तलाव भरण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. तसेच २५ वर्षांपासून रखडलेला देगाव जलसेतूचा प्रश्‍न मार्गी लागला असून त्याची चाचणीही झाली आहे. मार्चमध्ये त्याचा लोकार्पण सोहळा होईल.
- सुभाष देशमुख, आमदार
भीमा व सीना नदीवर बॅरेजेस बांधण्यासाठी सर्वेक्षणाच्या सूचना जलसंपदामंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार दोन्ही नद्यांचे सर्वेक्षण करून किती बंधारे बांधता येतील, किती पाणी उपलब्ध होईल? याचा अहवाल देण्यात येईल. तसेच पूरसंरक्षक घाट बांधण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्यासही सांगितले आहे. त्यानुसार लवकरच प्रस्ताव सादर करण्यात येईल.
- धीरज साळे, अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com