Nitin Gadkari and Prashant Paricharak Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Rate : साखर मूल्यांकन दरप्रश्नी गडकरींना साकडे

Team Agrowon

Solapur News : एनसीडीसी (राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ)कडील साखरेच्या मूल्यांकन दरामध्ये वाढ करावी आणि साखर मालतारण कर्जावरील मूल्यांकन दर वाढवावा, अशी मागणी केंद्रीय रस्ते ‍विकास व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना साकडे घातले आहे.

त्यावर एन.सी.डी.सी.चे कार्यकारी संचालक श्री. बन्सल यांनी येत्या आठवड्यात सकारात्मक निर्णय घेऊ, असे सांगितले आहे, अशी माहिती येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांनी दिली.

साखरेचा मूल्यांकन दर आणि, साखर मालतारण कर्जावरील मूल्यांकन दर वाढवावा, या मागणीसाठी श्री. परिचारक यांनी मंगळवारी (ता. १६) दिल्ली येथे श्री. गडकरी यांची भेट घेऊन चर्चा केली. या प्रश्नातून मार्ग काढून राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना दिलासा द्यावा अशी निवेदनाद्वारे मागणी केली. राज्यातील साखर कारखाने एनसीडीसीकडून साखर मालतारण कर्ज उपलब्ध करून घेतात.

त्यांना सध्या साखर मालतारण कर्जावरील उचलीचा दर प्रति क्विंटल ३ हजार १०० रुपये इतका पडतो. त्यातून पंधरा टक्के मार्जिन मनीची रक्कम वजा जाता प्रतिक्विंटल फक्त २ हजार ६३५ रुपये रक्कम कारखान्यांच्या हाती राहते. राज्य सहकारी बँक व राष्ट्रीयकृत बँकांकडून साखर मालतारण कर्जावरील उचलीचा दर प्रतिक्विंटल ३ हजार ४०० ते ३ हजार ५०० रुपये पर्यंत आहे.

तर, साखरेचा बाजारभाव प्रतिक्विंटल ३ हजार ५०० ते ३ हजार ७०० रुपयांपर्यंत आहे. एन.सी.डी.सी कडून साखर मालतारण कर्जावरील मिळणारा उचलीचा दर कमी असल्यामुळे, साखर कारखान्यांना ऊस बिलाची रक्कम व तोडणी वाहतूक खर्चासाठी रक्कम कमी उपलब्ध होत आहे. असे परिचारक यांनी गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिले.

त्यास अनुसरून, श्री गडकरी यांनी एनसीडीसीचे कार्यकारी संचालक बन्सल यांना फोनवरून सूचना दिल्या. त्यानंतर, श्री. परिचारक यांनी एन.सी.डी.सी.चे कार्यकारी संचालक बन्सल यांना भेटून साखरेचा मूल्यांकन दर वाढवण्याकरिता विनंती केली. येत्या आठवड्यात याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे यावेळी सांगितले आहे.

केंद्रीय रस्ते ‍विकास व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे साखर उद्योगाला दिलासा मिळाला आहे. साखर उद्योगास ऊर्जितावस्था यावी यासाठी ते नेमीच प्रयत्नशील राहिले आहेत. या प्रश्नातून देखील मार्ग काढून ते राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना दिलासा देतील असा विश्वास आहे.
प्रशांत परिचारक. अध्यक्ष, कर्मयोगी सुधाकरपंत कारखाना, श्रीपूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Warehouse : गोदामाच्या रचनेनुसार उंचीचे नियोजन

Serious Issues of Rape : लैंगिकतेचे शमन की दमन?

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

SCROLL FOR NEXT