Sugar Rate : इथेनॉल निर्मीतीवरील बंदीचा फटका; साखरेचे दर घसरले, शेतकऱ्यांसह कारखानदार अडचणीत

Ethanol Ban : केंद्र सरकारने उसाच्या रसापासून इथेनॉल तयार करण्यावर बंदी घातल्याने देशभरातील साखर कारखान्यांना मोठा फटका बसला आहे.
Sugar Rate
Sugar Rateagrowon
Published on
Updated on

Sugar Rate : केंद्र सरकारने उसाच्या रसापासून इथेनॉल तयार करण्यावर बंदी घातल्याने देशभरातील साखर कारखान्यांना मोठा फटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे दर उतरल्याने कारखान्यांना थेट परिणाम भोगावे लागणार आहेत तर शेतकऱ्यांना भविष्यात दराच्या माध्यमातून फटका बसण्याची शक्यता आहे. ४० रूपयांच्या वर असलेल्या साखरेचा दर अचानक ५ रुपयांनी कमी होऊन प्रती क्विंटल दर ३६०० वरून ३५५० पर्यंत खाली आला आहे.

अशातच साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने मागच्या दोन महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखर निर्यातीला बंदी घातली आहे. दरम्यान भविष्यात साखरेचा साठा वाढल्यास दर आणखी खाली येण्याची भिती आतापासूनच व्यक्त केली जात आहे.

यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे तर मागच्या वर्षीच्या तुलनेत १५ लाख मेट्रीक टन साखरेचे उत्पादन कमी होणार असल्याची माहिती तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. त्यामुळे बाजारातील साखरेचे दर वाढून महागाई निर्माण होईल, असे समजून केंद्र सरकारने ७ डिसेंबर रोजी उसाचा रस, साखरेपासून इथेनॉल निर्मिती करण्यावर बंदी घातली. या निर्णयाने इथेनॉल निर्मिती करणाऱ्या कारखान्यांसह अन्य खासगी प्रकल्पांना कोट्यावधी रुपयांचा फटका बसला. यानंतर आता साखरेचे दर उतरू लागल्याने कारखानदारांना मोठा फटका बसणार आहे.

कारखान्यातील बी व सी मोलॅसिसबरोबरच उसाचा रस, साखरेपासून इथेनॉल निर्मिती केली जाते. पूर्वी फक्त मोलॅसिसपासूनच इथेनॉल निर्मिती होत होती. पण काही कारखान्यांसह खासगी प्रकल्पांनी आपल्या प्रकल्पात कोट्यवधी रुपये गुंतवून रस व साखरेपासून इथेनॉल निर्मितीचे तंत्रज्ञान विकसित केले होते. मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या तुलनेत साखर व रसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलला जास्त म्हणजे प्रती लिटर ६५ रुपये ६१ पैसे दर मिळत होता

Sugar Rate
Brazil Sugar Export : ब्राझीलची साखर निर्यात २८ टक्क्‍यांनी वाढली

देशांतर्गत महिन्याला २२ ते २५ लाख टन साखर विकली जाते. लग्नसराई, सणाच्या महिन्यात यात वाढ होते. यापैकी काही साखर रेल्वेने, तर काही साखर ट्रकने वाहतूक केली जाते. रेल्वेने बल्क स्वरूपात पाठवणाऱ्या साखरेचे दर गेल्या आठवड्यात प्रती क्विंटल ३६०० रुपये होते, ते आता ३५५० पर्यंत खाली आले आहेत.

ट्रकने वाहतूक केलेल्या साखरेचे दर प्रती क्विंटल ३५५० वरून ३५०० पर्यंत खाली आले आहेत. प्रती लिटर ५० रुपये ही रक्कम कमी असली, तरी कारखन्यांत उत्पादित होणाऱ्या साखरेच्या तुलनेत ती मोठी आहे. त्यामुळे एका-एका साखर कारखान्याला या साखर विक्रीतूनच कोट्यवधी रुपयांचा फटका बसणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com