Agrowon Sanvad Agrowon
ॲग्रो विशेष

Agrowon Sanvad : पाणी जपले तरच भविष्य चांगले असेल

Team Agrowon

Nagar News : पाणी हे जीवन आहे. पाण्याची नासाडी थांबली पाहिजे. विहिरींची पाणी सुरक्षा पातळी, पडणारा पाऊस, मोजण्यासह जलअंदाजपत्रक, पर्जन्यमापक, नजर अंदाजपत्रक या महत्त्वाच्या बाबी आहेत. आज पाणी वाचवले तरच भविष्य चांगले आहे. अन्यथा पुढची पिढी माफ करणार नाही, असे सांगत नगर येथील भुजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे भुवैज्ञानिक अजिंक्य काटकर यांनी, पाणी वाचवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे, असे अवाहन केले.

‘ॲग्रोवन’ च्या वर्धापन दिनानिमित्त नगर तालुक्यातील सोनेवाडी (पिंपळगाव लांडगा) येथे ॲग्रोवन व ‘बॉस्को ग्रामीण विकास केंद्र’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पाणी-आज व उद्या काळाची गरज’ या विषयावर ‘ॲग्रो संवाद’ कार्यक्रम झाला. अजिंक्य काटकर, चास (ता. नगर) येथील कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. सुखदेव रणसिंग, डॉन बॉस्को ग्रामीण विकास केंद्राचे फादर जॉर्ज डिआब्रिओ, फादर क्लेरन्स मार्टिन यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

काटकर म्हणाले, की ‘अॅग्रोवन’मध्ये वाळू संवर्धनाबाबत प्रसिद्ध झालेला लेख आदर्श निर्माण करणारा आहे. वाळुमुळे पाणी साठून राहते. नदीचे, ओढ्याचे अतिखोलीकरण नुकसान करणारे आहे. त्यासाठी भुवैज्ञानिकांचे मार्गदर्शन घ्यायला हवे. लोक नद्यांना माता म्हणतात आणि तेच नद्या घाण करतात. पाणी जपण्यासाठी जलसंधारणाला प्राधान्य हवे. पाण्याची नासाडी थांबली पाहिजे. बाटलीबंद पाण्यासाठी पाण्याचा उपसा धोकादायक आहे.

त्यात पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. गावाची भुजल रचना, पावसाच्या पाण्याचा वापर आदींबाबत नियोजन हवे. तज्ज्ञाच्या मदतीने जलसुरक्षक आराखडा तयार करा. विहिरीची पाणी सुरक्षा पातळी, पाऊस मोजला पाहिजे. जलअंदाजपत्रक, पर्जन्यमापक, नजर अंदाजपत्रक या महत्त्वाच्या बाबी आहेत. पाणी माझे नाही तर आपले म्हणून जपा. आता पाण्याबाबत लोक जागे झाले नाहीत तर पुढील पिढी माफ करणार नाही.

ग्रामीणमधील पाणी संपल्यानंतर शहरीकरण बकाल होईल. सध्या शहरांसाठी शेतीचे पाणी पळवत आहे. तेथे पाण्याचा होणारा अपव्यय टाळला पाहिजे. शेततळे संरक्षित पाणी मिळण्याची संकल्पना. कागद टाकल्यावर या योजनेची वाट लागली. पाण्याचे रोज ३५ टक्के बाष्पीभवन होते, ते होणार नाही यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. पाणी अडवून ते जिरवणे, बंधाऱ्यांतील वरचा गाळ काढणे, विहीर पुनर्भरण, माती संवर्धन यासारख्या उपाययोजना आहेत, असे काटकर म्हणाले.

डॉ. सुखदेव रणसिंग म्हणाले, की हवामान बदलाचा शेतीवर परिणाम होत आहे. पॉलिहाऊस, शेडनेट प्रमाण मर्यादित असावे. हरित क्रांतीत जास्तीत उत्पादन करणारे वाण विकसित झाले. मात्र त्यामुळे रासायनिक खतांचा वापर, त्याचा परिणाम जमिनीच्या पोतावर झाला आहे. पाणी वाचवताना सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावे. प्रारंभी ‘अॅग्रोवन’चे नगर जिल्हा बातमीदार सूर्यकांत नेटके यांनी प्रस्ताविक केले. सिनिअर एक्झिक्युटिव्ह सचिन तवले यांनी स्वागत केले. संदीप बेरड यांनी सूत्रसंचालन केले. तर फादर जॉर्ज यांनी आभार मानले. सरपंच बाबासाहेब बेरड, दत्तात्रय गायकवाड, भीमराज तोडमल, मंगल बेरड, वंदना बेरड, रजनी कांबळे, राजेंद्र लांडगे, राजू पटेल, भावना घाटविसावे, मनीषा शिंदे तसेच गावकरी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT