Summer Crop Condition : पांगरी नवघरे परिसरात उन्हाळी पिके अडचणीत

Crop in Danger : पांगरी नवघरे शेतशिवाराला गेल्या कित्येक दिवसांपासून नियमित वीजपुरवठा मिळत नसल्यामुळे उन्हाळी पिके अडचणीत आली आहेत.
Summer Crop Condition
Summer Crop ConditionAgrowon

Washim News : तालुक्यातील अमानी फीडरअंतर्गत येत असलेल्या पांगरी नवघरे शेतशिवाराला गेल्या कित्येक दिवसांपासून नियमित वीजपुरवठा मिळत नसल्यामुळे उन्हाळी पिके अडचणीत आली आहेत.

Summer Crop Condition
Crop Damage : नाशिकमध्ये अवकाळीचा ७२९ हेक्टरला फटका

वाशीम जिल्ह्यात या भागात उन्हाळी मुगाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. या पिकाला सध्या वाढलेल्या उष्णतामानामुळे पाण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. परंतु सुरळीत वीजपुरवठा मिळत नाही. शेतकरी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधत असताना कुणीही उत्तर देत नाही. मोठ्या प्रमाणात तक्रारी असताना सुद्धा कुणी लक्ष देत नाही. यावर्षी आधीच खरिपात उत्पादन न झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

आलेल्या शेतीमालाला पुरेसा भाव मिळत नाही. शेतकरी आता उन्हाळी हंगामात खर्चाची भरपाई करण्याचा प्रयत्न करीत असताना अवकाळी व गारपिटीनंतर आता वीज संकटाला त्यांना सामोरा जावे लागत आहे. कित्येक दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे.

Summer Crop Condition
Summer Crops : दोन हजार हेक्टरवर उन्हाळी पिके

लोकसभा निवडणुकीचे वातावरण बनलेले असून गावागावात मतदानासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आश्वासने दिले जात आहेत. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेले आहे. शेतकऱ्यांना भर उन्हात विजेच्या लंपडावामुळे आपली पिके हातातून जाण्याचे संकट दिसते आहे.

अमानी सब स्टेशनअंतर्गत जे काही कमी भार आहे, त्यामुळे केबलचेही बऱ्याच प्रमाण नुकसान होत आहे. एक शेतकरी-एक कोटेशन-एक मोटरपंप ही मोहीम राबवली गेली पाहिजे. कारण उद्या वीज रोहित्र जळाले तर खर्चासह वीज रोहीत्र वाशीमवरून आणावे लागते. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी भरडला जातो.
गजानन नवघरे, शेतकरी, पांगरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com