Grape Orchard Agrowon
ॲग्रो विशेष

Vineyard Damage : बुरशीनाशकाच्या फवारणीमुळे द्राक्ष बागेचे ४५ टक्के नुकसान

Grape Cultivation : सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथे द्राक्ष उत्पादक शेतकरी रवींद्र तुकाराम बोराडे यांची आरा-३६ या वाणाची ३.६० हेक्टर क्षेत्रावर लागवड आहे.

Team Agrowon

Nashik News : सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथे द्राक्ष उत्पादक शेतकरी रवींद्र तुकाराम बोराडे यांची आरा-३६ या वाणाची ३.६० हेक्टर क्षेत्रावर लागवड आहे. येथील गट नं.१०२ व १०३ मधील बागेत बुरशीनाशकाची फवारणी केली.

या बागेत पानांवर स्कॉर्चिंग तसेच घड गळून पडल्याने ४५ टक्क्यांपर्यंत नुकसान दिसून आले आहे. याबाबत तालुका तक्रार निवारण समितीने पाहणी करून नुकसानीचा पंचनामा अहवाल दिला आहे.

याबाबात सविस्तर माहिती अशी, की आरा-३६ या द्राक्ष वाणाची रुट स्टॉक लागवड मार्च २०२३ मध्ये तर त्यावर ग्राफ्टिंग सप्टेंबर-२०२३ मध्ये करण्यात आलेली आहे. या दोन्ही गटातील द्राक्ष बागेची ऑक्टोबर छाटणी ही ६, ७ व १० ऑक्टोबर रोजी टप्प्याटप्याने केली होती.

त्यानंतर बोराडे यांनी आदामा कंपनीच्या कॉपर सल्फेट पेंटाहायड्रेट (२३.९९ एससी) हा सक्रिय घटक असलेल्या बुरशीनाशकाची खरेदी करून फवारणी केली होती. मात्र नंतर पानांना मोठ्या प्रमाणात स्कॉर्चिंग दिसून आले. तसेच पाने पिवळसर पडून खाली गळून पडलेली दिसून आली.

त्यानंतर शेतकऱ्याने संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींकडे नुकसान झाल्याचे कळवले. मात्र कंपनीकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याचे सांगत नुकसानग्रस्त शेतकरी बोराडे यांनी अखेर तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीकडे धाव घेतली. त्यानंतर समितीने प्रत्यक्ष पाहणी केली.

या वेळी उपविभागीय कृषी अधिकारी संजय सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी डी. आर. नाठे, पिंपळगाव बसवंत येथील द्राक्ष व कांदा संशोधन केंद्राचे डॉ. राकेश सोनवणे, सिन्नर पंचायत समितीचे कृषी अधिकारी एन. आर. अहिरे यांसह कंपनी प्रतिनिधी, नुकसानग्रस्त शेतकरी रवींद्र बोराडे, यासह शेतकरी अनिल डावरे, मधुकर डावरे आदी उपस्थित होते. पाहणीनंतर निष्कर्ष नोंदवून हा अहवाल समितीने दिला आहे.

उत्पादनात ४५ टक्के घट

द्राक्ष वेलींवरील तळाच्या ४ ते ५ पाने बाधित, स्कॉर्चिंग, पिवळसर झाल्याने प्रकाश संश्लेषण प्रक्रियेवर ४० ते ४५ टक्के परिणाम व वेलीवरील घडांच्या संख्येवर ४५ टक्के उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

२०२३-२४ मध्येही शेतकऱ्यांच्या शेतावर, द्राक्ष बागेत स्कॉर्चिंग झाल्याचे अनुभव योगेश रिकामे या शेतकऱ्याने तसेच सय्यदपिंप्री येथील मनोज जाधव यांच्याही बागेत पूर्वी स्कॉर्चिंग आढळून आल्याबाबत समितीच्या दौऱ्यावेळी भ्रमणव्धनीद्वारे कथन केलेले आहे, असे तक्रार समितीच्या नुकसान पाहणी व पंचनामा अहवालात नमूद केले.

दिसून येत असलेले नुकसान

पाने खराब झाल्याने शेंडा खराब होऊन वाढ थांबली

माल फुगवण होण्यास अडचणी

पुढील वर्षी वेलीच्या वाढीवर व अन्नसाठ्यावर परिणाम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mathura Labhan Cattle Breed : मराठवाड्यातील देखणा गोवंश ः मथुरा लभाण

Humani Control: १५ दिवसांत हुमणी करा गायब; हुमणी नियंत्रणाचे सोपे ३ मार्ग !

Pearl Farming : शिंपल्याच्या शेतीतून मोतीनिर्मिती

Manikrao Kokate Controversy: कृषिमंत्री कोकाटेंची अजित पवारांकडून खरडपट्टी; कृषिमंत्र्यांनी मागितली माफी

Silk Farming : रेशीम उद्योगाने वाचविली तोट्यातील शेती

SCROLL FOR NEXT