Harnabari Canal Agrowon
ॲग्रो विशेष

Harnabari Dam : हरणबारी उजव्या कालव्यासाठी निधी मंजूर

MP Subhash Bhamre : गेल्या २५ वर्षापासून मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या हरणबारी उजवा कालव्याच्या कामासाठी शासनाने ३३ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी मंजूर करत प्रशासकीय मान्यता दिल्याची माहिती खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.

Team Agrowon

Nashik News : बागलाण व मालेगाव तालुक्यासाठी जलसंजीवनी ठरणाऱ्या व गेल्या २५ वर्षापासून मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या हरणबारी उजवा कालव्याच्या कामासाठी शासनाने ३३ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी मंजूर करत प्रशासकीय मान्यता दिल्याची माहिती खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.

डॉ. भामरे म्हणाले, की बागलाण तालुक्यातील करंजाडी खोरे ते मालेगाव तालुक्यातील सातमाने दुंधे तळवाडेपर्यंतच्या दुष्काळग्रस्त भागाला पिण्याचा पाण्यासाठी टँकरचा वापर करावा लागत होता. या गावांसाठी हरणबारी उजवा कालवा व्हावा व धरणाचे पाणी दुष्काळी गावागावात पोचावे, अशी अपेक्षा शेतकरी बांधवांची होती.

आता हरणबारी उजवा कालव्यासाठी पाणी आरक्षित करून घेतले असून, कालव्याचे प्रत्यक्ष सर्वेक्षण झाल्यानंतर हा कालवा बंदिस्त स्वरूपाचा व्हावा, त्याच्यामुळे जमीन अधिग्रहण व शेवटच्या टोकापर्यंत प्रत्येक गावाला हे पाणी पोहचेल असे प्रयोजन केले. कालवा बंदिस्त केल्याचे ठरविल्यानंतर तापी महामंडळ जळगाव यांनी या कालव्याची जलवाहिनीचा आराखडा बदलला. त्याला मेरीने मंजुरी दिली.

या कालव्याला मागील ७-८ महिन्यांपूर्वी जलसंपदा विभागाकडून मंजुरी मिळाली, त्यानंतर या कालव्याला निधी उपलब्ध झाला व १३ फेब्रुवारीस अंतिम प्रशासकीय मान्यता मिळाली. बागलाण व मालेगाव तालुक्यातील प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष हरणबारी उजव्या कालव्यातील लाभ क्षेत्रातील येणाऱ्या गावांना सिंचनाचा व पिण्याचा पाण्याचा फायदा होणार आहे.

या गावांना होणार फायदा

पारनेर, निताने, बिजोटे, आखतवाडे, आनंदपूर, गोराणे, कोटबेल, कोळीपाडा, आसखेडा, द्याने, खिरमाणी, फोपीर, नामपूर, कुपखेडा, नळकस, सारदे, काकडगाव, अंबासन, रातीर, रामतीर, सुराणे, देवळाणे, दुंधे-तळवाडे, तळवाडे, वायगाव, सातमाने तसेच केळझर वाढीव चारी क्र. आठला देखील महाराष्ट्र नियामक मंडळाने मंजुरी दिलेली आहे.

बागलाण तालुक्यातील हरणबारी उजवा कालवा मंजूर करणे हे मोठे आव्हान होते. परंतु जनतेने दिलेला आशीर्वाद व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोलाचया सहकार्यामुळे हे काम मी पूर्ण करू शकलो. त्यामुळे दुष्काळग्रस्त गावांचा पिण्याचा पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे.
डॉ. सुभाष भामरे, खासदार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

HTBT Cotton: ‘एचटीबीटी’ कापसावरील बंदी उठविली जाणार?

Crop Insurance Scheme: पीकविमा योजनेत बदल अशक्य : कोकाटे

Nagpur Market Scam: नागपूर बाजार समितीतील घोटाळ्याची ‘लाचलुचपत’मार्फत चौकशी

Crop Insurance Scheme: पीकविमा योजनेला राज्यात थंडा प्रतिसाद

Vidarbha Rain Forecast: विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT