Water Shortage Fund Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity Fund : जळगाव जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी निधी वितरित

Water Fund : जळगाव जिल्ह्यातील टंचाई निवारणासाठी आणि उपाययोजनांसाठी तालुकास्तरावर तीन कोटी ३२ लाखांचा निधी वर्ग करण्यात आला आहे.

Team Agrowon

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील टंचाई निवारणासाठी आणि उपाययोजनांसाठी तालुकास्तरावर तीन कोटी ३२ लाखांचा निधी वर्ग करण्यात आला आहे.

गंभीर दुष्काळ जाहीर झालेल्या चाळीसगाव तालुक्याला एक कोटी अकरा लाखांचा, तर अमळनेर तालुक्याला एक कोटी ५० लाखांचा निधी वितरित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

टंचाई निवारण २०२२-२३ अंतर्गत २०२३-२४ साठी ग्रामीण व नागरी भागात पिण्याच्या पाण्याच्या उपाययोजनांसाठी हा निधी देण्यात आला आहे.

प्रलंबित देण्याच्या अभिकरण योजनेच्या लेखाशीर्ष २२१५ ए, १९५ नैसर्गिक आपत्ती २०२३-२३ चे अनुदानाचा समावेश आहे. दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर टँकर, विहीर अधिग्रहण, तात्पुरती पाणीपुरवठा योजना, कूपनलिका यासाठी निधी देण्यात आला आहे.

तालुकानिहाय वितरित निधी (आकडे रुपयांमध्ये दर्शवितात)

बोदवड दोन लाख ५४ हजार

रावेर एक लाख २७ हजार

चोपडा दोन लाख ५० हजार

यावल चाळीस हजार

पारोळा तेरा लाख

भडगाव एकवीस लाख

पाचोरा एकवीस लाख

जामनेर ९५ लाख ५० हजार

भुसावळ सात लाख

मुक्ताईनगर आठ लाख

जळगाव एक लाख

एरंडोल ४६ हजार ८००

धरणगाव एक लाख ७५ हजार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

Government Assistance: शेतकरी आत्महत्येची आठ प्रकरणे मदतीसाठी पात्र

Marathwada Rain Deficit: मराठवाड्यात पावसाच्या तुटीमुळे पेरणी क्षेत्रात ७ टक्क्यांची घट

Buldhana DCC Bank: बुलडाणा जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचे वर्चस्व

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT