Water Supply Scheme Fund : आमच्या सरकारने पाणीपुरवठा योजनांसाठी ७८२ कोटी दिले

महाविकास आघाडी सरकारच्या काळात निळवंडे कालव्यासाठी मोठा निधी मिळवून रात्रंदिवस काम सुरू ठेवले. डाव्या व उजव्या कालव्यांद्वारे ऑक्टोबर २०२२ पाणी देण्याचे उद्दिष्ट होते.
Water Supply
Water SupplyAgrowon
Published on
Updated on

Nagar News : महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi Government) काळात निळवंडे कालव्यासाठी मोठा निधी मिळवून रात्रंदिवस काम सुरू ठेवले. डाव्या व उजव्या कालव्यांद्वारे ऑक्टोबर २०२२ पाणी देण्याचे उद्दिष्ट होते. मात्र सरकार बदलले आणि काम थंडावले.

ही कामे आपणच केली, मात्र सत्ता बदलामुळे काही दुसरे पाहुणे येतील. परंतु कामे कोणी केली जनतेला सगळे माहीत आहे. संगमनेर तालुक्यातील सर्व पाणीपुरवठा योजनेसाठी आमच्या काळातच ७८२ कोटी रुपयांचा निधी दिला गेला, असे आमदार बाळासाहेब थोरात (MLA Balasaheb Thorat) यांनी सांगितले.

बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते संगमनेर तालुक्यातील झोळे येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत झोळे, चंदनापुरी, हिवरगाव पावसा, आनंदवाडी व गणेशवाडी पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन झाले. अध्यक्षस्थानी आर. बी. राहणे होते.

नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, तालुका दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्‍थित होते.

Water Supply
Bhausaheb Thorat Sugar Mill: भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या गाळपाची उद्या सांगता

आमदार थोरात म्हणाले, की चंदनापुरी, झोळे, हिवरगाव पावसा या गावांच्या पाणीपुरवठा योजनेकरिता ५९ कोटी १६ लाख रुपये, निमगाव जाळी, कोल्हेवाडी, तळेगाव, निमोण, निमगाव, घुलेवाडी आदी पाणी योजनेसाठी ७८२ कोटी रुपयांचा निधी मिळाला.

या परिसरातील गावांच्या पुढील २५ वर्षांच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन केले आहे. आमच्या सरकारने निधी दिलेला असताना आता मात्र दुसरेच श्रेय घेत आहेत.

चांगल्या कामात अडथळे निर्माण करण्याचे कामे सुरू आहे. जिल्ह्यात सध्या दहशतीचे राजकारण सुरू आहे. आपण सर्व एकत्रितपणे लढून त्यांना पुरून उरू.

खबऱ्यांचा बंदोबस्त जनता करेल

आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘‘संगमनेर तालुक्यातील विविध विकासकामांमध्ये अडथळे निर्माण करण्यासाठी काही खबरे काम करत आहेत. कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यावर खोट्यानाट्या केसेस दाखल करण्याचे काम सध्या सुरू आहे. विकासकामात अडथळे आणणाऱ्या या खबऱ्यांचा बंदोबस्त जनताच करेल.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com