Farmer Loan Waive Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Loan Waive : शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण करा ; कर्जमाफीच्या मागणीला जोर

Agriculture Lona Waive Scheme : मागील पाच वर्षांत केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे शेतकरी रसातळाला गेला आहे. त्यातच सोयाबीन, कापूस, तूर, दूध, साखर, डाळी आदींच्या पडलेल्या दरामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

Team Agrowon

Nanded News : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीकडून शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ करून शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याचे आश्‍वासन दिले होते. यानंतर राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आले आहे.

यामुळे त्या आश्‍वासनाची पूर्तता राज्य सरकारने तातडीने करून दिलेला शब्द पाळावा, अशी मागणी नांदेड जिल्ह्यातील शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकऱ्यांकडे नुकतीच केली.

मागील पाच वर्षांत केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे शेतकरी रसातळाला गेला आहे. त्यातच सोयाबीन, कापूस, तूर, दूध, साखर, डाळी आदींच्या पडलेल्या दरामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीत शेतकऱ्यांना शेतीमाल विकावा लागत आहे. रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाट वाढ झाली आहे.

डीएपी खतामध्ये पुन्हा २५० रुपयांची वाढ झाली आहे. कीटकनाशके, तणनाशकांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. सरकार हमीभाव जाहीर करते, पण हमीभावाचा कायदा अस्तित्वात नसल्याने शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी किमतीत शेतीमाल विकावा लागत आहे. परिणामी, गेल्या पाच वर्षांत शेतकऱ्यांचे कर्ज दुप्पट झाले आहे.

एका बाजूला केंद्र सरकार देशातील कार्पोरेट कंपन्यांचे १० लाख कोटींच्या कर्जाचा निर्णय घेत ते कर्ज राइट ऑफ करत आहे. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचे कर्ज दुप्पट होते ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे, असे निवदेनात म्हटले आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात महायुतीकडून शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे महायुतीला शेतकऱ्यांनी भरभरून मते दिली आहेत.

यामुळे महायुती सत्तेत आली. आता राज्य सरकारने येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपला दिलेला शब्द पाळावा, अन्यथा संपूर्ण कर्जमाफीसाठी राज्यातील शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून सरकार विरोधात जनआंदोलन सुरू करावे लागेल, असा इशारा नांदेड जिल्ह्यातील शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रकाश पोपळे, शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. धोंडिबा पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत राजेगोरे आर. पी. कदम, हरिभाऊ कदम, किशनराव कदम, शंकरराव राजेगोरे, मारोतराव खवास, प्रल्हाद पाटील हडसनीकर, शिवाजी वानखेडे, शिवशंकर कलंबरकर, बालाजी कल्याणकर, लक्ष्मण शिंदे, शिवाजी शिंदे, केशव बाबाराव, मंगेश सुर्वे, मारोतराव भांगे, बालाजी कदम, गोविंदराव लोंढे, गोविंदराव जोगदंड, अंबादास हंबर्डे, सीताराम मोरे, राम पांगरीकर, मधुकर राजेगोरे, हरिदास बिहारीपुरकर आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT