Fruit Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Crop Insurance : नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मिळणार फळपीक विमा परतावा

Crop Insurance Compensation : आंबा, काजू या फळपिकांचा विमा परतावा नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल, असे आश्वासन जिल्हा कृषी अधीक्षकांनी ठाकरे गटाला दिले.

Team Agrowon

Sindhudurg News : आंबा, काजू या फळपिकांचा विमा परतावा नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल, असे आश्वासन जिल्हा कृषी अधीक्षकांनी ठाकरे गटाला दिले. त्यामुळे बुधवारपासून होणारे नियोजित आंदोलन स्थगित करण्यात आले.

जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदारांना परतावा मिळाला नाही तर १ नोव्हेंबरला कृषी अधीक्षक कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिला होता. यासंदर्भात जिल्हा कृषी अधीक्षक विजयकुमार राऊत यांनी मंगळवारी (ता. ३१) आमदार वैभव नाईक यांची भेट घेतली.

या वेळी सतीश सावंतदेखील उपस्थित होते. या वेळी राऊत यांनी राज्य सरकारने आपल्या हिश्‍श्‍याची रक्कम विमा कंपनीकडे जमा केली आहे. येत्या दोन दिवसांत केंद्र शासनाच्या हिश्‍श्‍याची रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात विमा परतावा जमा होण्यास सुरुवात होईल.

त्यामुळे आंदोलन करू नये अशी विनंती राऊत यांनी केली. आमदार नाईक यांनी जर परतावा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही तर पुन्हा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटीलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आठ दिवसांची मुदत कृषी विभागाला देत असल्याचे जाहीर केले.

पीकविम्यासाठी ६ नोव्हेंबरला तीन वाजता राज्याच्या कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली दालन क्रमांक ५०९ मध्ये सभा होणार असल्याचेदेखील नाईक यांनी स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT