Paddy MSP agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Pest Control : बेडकांमुळे भातशेतीतील किडींचे नियंत्रण शक्य

Paddy Pest Management : भातशेतीमध्ये विविध किडींचे नैसर्गिक नियंत्रण करण्यामध्ये बेडकांचे अत्यंत महत्त्व आहे. त्याविषयी विविध ठिकाणी प्रयोगही झाले आहेत.

Team Agrowon

Wangaon News : भातशेतीमध्ये विविध किडींचे नैसर्गिक नियंत्रण करण्यामध्ये बेडकांचे अत्यंत महत्त्व आहे. त्याविषयी विविध ठिकाणी प्रयोगही झाले आहेत. बेडकांचे संवर्धन करणे गरजेचे झाले आहे. बेडूक भातशेतीत किडींचे नियंत्रण करून शेतकऱ्यांना मदतच करतात.

बेडकांची संख्या घटल्याने मलेरिया रोगाचा जोराने फैलाव सुरू झाला आहे. त्यामुळे त्यांच्या संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीस बेडूक दिसू लागतात. पावसाळा संपताच पुढील मॉन्सून येईपर्यंत ते जमिनीत गाडून घेतात, याला सुप्तावस्था म्हणतात.

संवर्धन करण्यासाठी शेताच्या बाजूच्या खोलगट भागात छोटे तळे तयार करावे. त्यात सुप्तावस्थेसाठी जागा मिळेल. बेडकांची संख्या कमी होऊ नये, यासाठी रासायनिक कीडनाशके आणि रासायनिक खतांचा होणारा अनियंत्रित वापर थांबवला पाहिजे, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्रातील पीक संरक्षणतज्ज्ञ उत्तम सहाने यांनी दिली.

ॲग्रो विशेष

आपल्या देशात ‘राना टायग्रीना’ आणि ‘फेजरवरया लीमनोचारिस’ या दोन प्रजातींचे बेडूक मोठ्या प्रमाणात भातशेतीत आढळतात. अळ्या, तुडतुडे, नाकतोडे, गोगलगाईंना ते खातात.

संवर्धन गरजेचे

पर्णकोष करपा रोगाचे प्रमाण (वाहक कमी झाल्याने) कमी होते.

जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढते. जमीन सुपीक होऊन भाताची वाढ चांगली होते.

भाताच्या पानांमध्ये काही प्रमाणात हरितद्रव्य, विद्राव्य प्रथिने व साखरेचे प्रमाण वाढते.

जमिनीतील उपयुक्त सूक्ष्म जीवांच्या संख्येत वाढ झाल्याचे आढळले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Winter Weather Update: ढगाळ हवामानामुळे थंडी कमी ; किमान तापमानात चांगली वाढ

Farm Labour Shortage: मजूरटंचाईमुळे तूर मळणीची कार्यवाही रखडत

Sugar Production: राज्यात दोन महिन्यांत ४९२ लाख क्विंटल साखर उत्पादन, कोल्हापूर विभागात सर्वाधिक

Kharif Paisewari: अकोला जिल्ह्याची सरासरी ४८ पैसेवारी

Natural Farming: घोडके यांची नैसर्गिक शेती उपक्रमाचा आढावा

SCROLL FOR NEXT