Neem Tree Agrowon
ॲग्रो विशेष

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Article by Maharudra Mangnale : गेल्या आठवड्यात एका नोंदीमध्ये रुद्रा हट परिसरात मी लावलेली कडूनिंबाची शंभर-सव्वाशे तरी झाडं असतील, असा उल्लेख मी केला होता. पण मलाच कुठेतरी ते खटकत होतं. गतवर्षी एकदा सगळी झाडं मोजली होती.

Team Agrowon

Neem Tree : गेल्या आठवड्यात एका नोंदीमध्ये रुद्रा हट परिसरात मी लावलेली कडूनिंबाची शंभर-सव्वाशे तरी झाडं असतील, असा उल्लेख मी केला होता. पण मलाच कुठेतरी ते खटकत होतं. गतवर्षी एकदा सगळी झाडं मोजली होती.

पुन्हा एकदा मोजून खात्री करावी असं वाटलं. कारण मी सात-आठ एकर जमिनीच्या बंधाऱ्यावर सुमारे ५५०-६०० झाडं लावली होती. दुसऱ्या वर्षी या सगळ्या झाडाच्या बुडाला ठिबकची नळी अंथरून जगवलं होतं. रोपं आडवी पडू नयेत म्हणून त्याला वेळूच्या काठ्या लावल्या. पस्तीस हजाराच्या काठ्या हंडरगुळी बाजारातून दोन वेळा आणल्या, त्याच्या लिखीत नोंदी आहेत.

झाडं चांगली वाढत असतानाच सायाळने कडूनिंबाच्या झाडांच्या मुळा खायला सुरूवात केली. झाडांच्या बुडाला थायमेट टाकण्यापासून बाईडिंग तार लावण्यापर्यंत बऱ्याच गोष्टी केल्या पण सायाळने दाद दिली नाही. दोन बंधाऱ्यांवरील सगळी झाडं साफ केली. इतर दोन बंधाऱ्यांवरील झाडांचं नुकसान केलं.

एवढंच नाही तर, बागेतील नारळाच्या दोन झाडांचं नुकसान केलं. मात्र इतर तीन बंधाऱ्याकडं सायाळनं फारसं लक्ष दिलं नाही. मी वैतागून या झाडांकडं बघणं सोडून दिलं. सायाळ खाऊन राहतील ती झाडं आपली, असं म्हणून निवांत बसलो.

पण निसर्ग चक्र चालूच होतं. पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा दरवर्षी येतोयच. झाडांना हेच तर लागतं. त्यातही कडूनिंबाची झाडं प्रतिकूल परिस्थितीत वाढणारी. ती वाढतच राहिली. बहुतेक सायाळलाही कडुनिंबाच्या मुळांचा कंटाळा आला असावा. ते दोन बंधारे वगळता इतर ठिकाणची झाडं वाढत राहिली.

चार दिवसांपूर्वी लातूरला जाण्याच्या आदल्या दिवशी मी कडूनिंबाची गणना सुरू केली. एक तासात ती संपली. तीन कि.मी.ची पायपीट झाली. आणि लिंबवन बघूशन चकीत झालो. काही झाडं खूपच चांगली डेरेदार झालीत. जिथं दोन झाडातील अंतर कमी आहे. तिथल्या झाडांचा बुंधा मोठा झाला नव्हता पण ती उंच वाढली होती.

काही झाडं एका बाजुला कलंडली होती तर काही झाडं फारशी वाढली नव्हती. एकंदरीत ६०ते ७० टक्के झाडं चांगली वाढलीत, वाढताहेत. बाकींना वेळ लागेल. सायाळने मुळा खाल्याने जी झाडं आडवी पडलीत, तिथं नव्याने फुटवा आलाय.त्याची वेळोवेळी छाटणी केली तर, ते पुन्हा झाडं होऊ शकतं. बारकाईने बघत मळ्यातील मी लावलेली सगळी कडुनिंबाची झाडं मोजली. ती संख्या भरली ४३५ .म्हणजे सायाळमुळं शंभर-सव्वाशे झाडं गेली असावीत.

शेवटी कडुनिंबाच्या झाडांनी सायाळवर मात केलीय . हे सगळे बंधारे कडुनिंबाच्या या झाडांमुळे हिरवेगार झालेत. भर उन्हातही तिथं गारवा जाणवतोय. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या बंधाऱ्यांवरील आयचान कमी झालयं. यातील काही झाडांना लिंबोळ्या लागल्यात. सगळ्याच झाडांना लिंबोळ्या लागतील तेव्हा त्यापासून भरपूर खत तयार करण्याचं नियोजन आहे. हा खतच आमच्या शेतीची अन्नाची गरज भागवेल.

याशिवाय रुद्रा हटपरिसरात पूर्वीची चार मोठी लिंबाची झाडं आहेत. रस्त्यापलिकडच्या शेतात नैसर्गिकरित्या वाढलेली २२ झाडं आहेत. म्हणजेच केवळ कडुनिंबाची ४५०पेक्षा अधिक झाडं आहेत. इतर झाडं, वेली वेगळ्याच.

या कडुनिंबाच्या लागवडीमागे या झाडांबद्दल मला बालपणापासून असलेलं प्रेम कारणीभूत असावं. शालेय आयुष्यातच मी लिंबाच्या काडीने दात घासायचो. अधूनमधून थोडा ताजाही खायचो. पुढे पिकलेल्या लिंबोळ्यांची चव घ्यायचो. हे आजपर्यंत चालूच आहे. याशिवाय माळाच्या पोटाला लिंबाचं एक मोठं झाड होतं.

या झाडावर मी सगळ्या फांद्यांवर फिरायचो. तिथं बसण्याची एक छान जागा होती. सावलीची. मी तास न् तास वाचत बसायचो. यामुळं कदाचित लिंबाच्या झाडाबद्दल मला जास्त आकर्षण असावं. लिंबांचं सेवन आणि सहवासामुळेच, कदाचित माझ्यात कडूपणा आला असावा. अर्थात जेव्हा गरज भासते तेव्हाच तो बाहेर येतो. एकंदरीत कडूनिंबाची सोबत माझ्यासाठी कायम गोड राहिलेली आहे.

चार दिवसांपूर्वी लातूरला जाण्याच्या आदल्या दिवशी मी कडूनिंबाची गणना सुरू केली. एक तासात ती संपली. तीन कि.मी.ची पायपीट झाली. आणि लिंबवन बघूशन चकीत झालो. काही झाडं खूपच चांगली डेरेदार झालीत. जिथं दोन झाडातील अंतर कमी आहे.  तिथल्या झाडांचा बुंधा मोठा झाला नव्हता पण ती उंच वाढली होती.

काही झाडं एका बाजुला कलंडली होती तर काही झाडं फारशी वाढली नव्हती. एकंदरीत ६०ते ७० टक्के झाडं चांगली वाढलीत, वाढताहेत. बाकींना वेळ लागेल. सायाळने मुळा खाल्याने जी झाडं आडवी पडलीत, तिथं नव्याने फुटवा आलाय.त्याची वेळोवेळी छाटणी केली तर, ते पुन्हा झाडं होऊ शकतं.

बारकाईने बघत मळ्यातील मी लावलेली सगळी कडुनिंबाची झाडं मोजली. ती संख्या भरली ४३५ .म्हणजे सायाळमुळं शंभर-सव्वाशे झाडं गेली असावीत. शेवटी कडुनिंबाच्या झाडांनी सायाळवर मात केलीय . हे सगळे बंधारे कडुनिंबाच्या या झाडांमुळे हिरवेगार झालेत. भर उन्हातही तिथं गारवा जाणवतोय. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या बंधाऱ्यांवरील आयचान कमी झालयं. यातील काही झाडांना लिंबोळ्या लागल्यात. सगळ्याच  झाडांना लिंबोळ्या लागतील तेव्हा त्यापासून भरपूर खत तयार करण्याचं नियोजन आहे. हा खतच आमच्या शेतीची अन्नाची गरज भागवेल.

याशिवाय रुद्रा हटपरिसरात पूर्वीची चार मोठी लिंबाची झाडं आहेत. रस्त्यापलिकडच्या शेतात नैसर्गिकरित्या वाढलेली २२ झाडं आहेत. म्हणजेच केवळ कडुनिंबाची ४५०पेक्षा अधिक झाडं आहेत. इतर झाडं, वेली वेगळ्याच. 

या कडुनिंबाच्या लागवडीमागे या झाडांबद्दल मला बालपणापासून असलेलं प्रेम कारणीभूत असावं. शालेय आयुष्यातच मी लिंबाच्या काडीने दात घासायचो. अधूनमधून थोडा ताजाही खायचो. पुढे पिकलेल्या लिंबोळ्यांची चव घ्यायचो. हे आजपर्यंत चालूच आहे. याशिवाय माळाच्या पोटाला लिंबाचं एक मोठं झाड होतं.

या झाडावर मी सगळ्या फांद्यांवर फिरायचो. तिथं बसण्याची एक छान जागा होती. सावलीची. मी तास न् तास वाचत बसायचो. यामुळं कदाचित लिंबाच्या झाडाबद्दल मला जास्त आकर्षण असावं. लिंबांचं सेवन आणि सहवासामुळेच, कदाचित माझ्यात कडूपणा आला असावा. अर्थात जेव्हा गरज भासते तेव्हाच तो बाहेर येतो. एकंदरीत कडूनिंबाची सोबत माझ्यासाठी कायम गोड राहिलेली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT