Fruit Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Crop Insurance : फळपीक विम्याचे बोगस साडेचौदा हजार प्रस्ताव रद्द

Crop Insurance Scheme : फळपीक नसताना ‘पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजने’साठी आलेले साडेचौदा हजार बोगस प्रस्ताव कृषी खात्याने रद्द केले आहेत.

मनोज कापडे

Pune News : फळपीक नसताना ‘पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजने’साठी आलेले साडेचौदा हजार बोगस प्रस्ताव कृषी खात्याने रद्द केले आहेत. या पूर्वीच्या तपासणी अभियानात साडेसात हजार बोगस प्रस्ताव आढळले होते. यातील बनावट विमाधारकांची साडेआठ कोटी रुपयांची विमाहप्ता रक्कमदेखील जप्त करण्यात आली होती.

कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, फळपीक विमा योजनेच्या ‘आंबिया बहर २०२२-२३’ मध्ये हजारो बोगस अर्ज असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. त्यानुसार, प्रत्येक प्रस्तावाची प्रत्यक्ष तपासणी केली असता १४ हजार ५७० अर्ज अपात्र करावे लागले आहेत. यामुळे शासनाचा ६५.३६ कोटी रुपयांचा विमा हप्ता वाचला आहे.

यामुळे खोट्या माहितीच्या आधारे विमा योजनेत भाग घेणाऱ्यांना चाप बसला आहे. त्यामुळे गेल्या मृग बहराच्या तुलनेत चालू बहरासाठी ४० हजार १४० विमा प्रस्ताव कमी दाखल झाले आहेत. यामुळे शासनाचा ४४.५७ कोटींचा विमा हप्तादेखील वाचला आहे.

फळपीक विमा योजनेत मृग व आंबिया अशा दोन बहरांसाठी भाग घेता येतो. संत्रा, मोसंबी, लिंबू, चिकू, पेरू, सीताफळ, द्राक्ष, आंबा, काजू, पपई, स्ट्रॉबेरी, डाळिंब, केळीसाठी ही योजना उपलब्ध आहे.

विमा प्रस्ताव दाखल केल्यानंतर कृषी अधिकारी व विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी फळबागांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यात लागवड नसताना विमा घेणे, दुसऱ्या शेतकऱ्याला न सांगता भाडेकराराने विमा उतरवणे, जादा क्षेत्र दाखवून विमा घेणे तसेच उत्पादनक्षम बागा दाखवून विमा घेणे अशा गंभीर बाबी तपासणीत आढळल्या.

तपासणीअंती नामंजूर केलेल्या साडेचौदा हजार विमा प्रस्तावांची एकूण विमा हप्ता रक्कम ६५ कोटींच्या आसपास होती. त्यात अर्जदाराचा हिस्सा १३.४९ कोटी तर केंद्र व राज्य मिळून विमा हप्ता अनुदान हिस्सा ५१.८७ कोटीच्या आसपास होता.

त्यामुळे या प्रकरणात साडेतेरा कोटींची बचत झाली आहे. ही रक्कम केंद्राच्या तांत्रिक विकास निधीत जमा केली जाईल. मृग २०२२ व २०२३ या दोन्ही हंगामांची तुलना करता यंदा प्राप्त अर्जांची संख्या ४० हजारांनी घटली आहे. विमा संरक्षित क्षेत्रदेखील २८ हजार ५८७ हेक्टरने, तर विमा हप्ता रकमेच्या संकलनात ४४.५७ कोटींनी घट झाली आहे.

मृग बहर फळपीक विमा योजना स्थिती

हंगाम वर्ष---विमा प्रस्ताव संख्या...विमा संरक्षित क्षेत्र...एकूण विमा हप्ता (कोटी रुपयांत)

मृग बहर २०२२...११४४१५...८१६६०...१२७.४२

मृग बहर २०२३...७४२७५...५३०७३...८२.८५

यंदा झालेली घट...४०१४०...२८५८७...४४.५७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

Maharashtra Winter Weather : किमान तापमानात चढ-उतार शक्य

SCROLL FOR NEXT