Kolhapur Loksabha Election 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Loksabha Election 2024 : मंडलिकांच्यानंतर आता पुत्र वीरेंद्रचा हल्लाबोल; थेट साधला छत्रपती घराण्यावर निशाणा 

Virendra Mandalik On Shahu Maharaj Chhatrapati : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं आहे. यादरम्यान महायुतीचे उमेदवार माजी खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी थेट छत्रपती घराण्यावर निशाणा साधला आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सध्या जोरदार प्रचार सुरू आहे. येथे ७ मे रोजी मतदान होणार असून महायुतीचे उमेदवार माजी खासदार संजय मंडलिक आणि महाआघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांचा प्रचार शिगेला पोहचला आहे. यादरम्यान मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी प्रचारात उडी घेतली आहे. वीरेंद्र यांनी, छत्रपती घराण्यावर निशाणा साधला असून 'श्रीमंत शाहू महाराज यांच्या घराण्याने कोल्हापूरसाठी कोणतेच साजेसे काम केलेले नाही, असे धक्कादायक विधान केले आहे. यामुळे पुन्हा एकदा कोल्हापुरात तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

छत्रपती घराण्याणे एखादा उद्योग राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने सुरू केलेला दाखवावा, असे आवाहन करत वीरेंद्र मंडलिक म्हणाले, 'राजर्षी शाहू महाराजांचे खरे जनक वारसदार हे समरजितसिंह घाटगे आहेत. आताच्या छत्रपती कुटुंबाने राजर्षी शाहूंच्या नावाला साजेल असे कोणतेच काम केलेले नाही.

'आताचे श्रीमंत शाहू महाराज किंवा त्यांच्या कुटुंबाला अनेक वर्षांपासून बंद पडलेली शाहू मिल सुद्धा यांना सुरू करता आलेली नाही. उलट विक्रमसिंह घाटगे आणि समजितसिंह घाटगे यांनी ते काम केलं आहे. राजर्षी शाहू महाराज यांचे जनक घराणे म्हणून स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे आणि समरजितसिंह घाटगे यांनी साजेसं काम केलं आहे' असे वीरेंद्र मंडलिक म्हणाले.

'समरजितसिंह घाटगे हेच राजर्षी शाहू महाराज यांचे खरे जनक वारसदार आहेत', असेही वीरेंद्र यांनी म्हटले आहे. स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांनी राजर्षी शाहू महाराज यांची मूल्य जपत शाहू कारखाना सुरू केला. मात्र श्रीमंत शाहू महाराज किंवा त्यांच्या कुटुंबाला एखादा उद्योग शाहू महाराजांच्या नावानं सुरु करता आलेले नाही', अशी टीका वीरेंद्र मंडलिक यांनी केली आहे.

संजय मंडलिक यांनी काही दिवसांपूर्वीच श्रीमंत शाहू महाराज यांच्यावर वादग्रस्त विधान केलं होते. त्यांनी, 'श्रीमंत शाहू महाराज कोल्हापूरचे आहेत का? ते राजर्षी शाहू महाराजांचे खरे वारसदार आहेत का? ते दत्तक आहेत', असे वादग्रस्त विधान केले होते. यामुळे त्यांच्यावर राज्यभरातून टीका झाली होती. यानंतर आता मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी देखील 'छत्रपती कुटुंबांवर हल्लाबोल केला आहे. यामुळे कोल्हापूरचे राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT