Loksabha Election 2024 : पहिल्या टप्प्यात विदर्भात ‘हेवीवेट’ उमेदवारांसाठी मतदान

Election Update : देशात लोकसभेच्या १०२ मतदार संघांसाठी उद्या (ता.१९) पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पाच मतदार संघांचा समावेश असून, हे पाचही मतदार संघ पूर्व विदर्भातील आहेत.
Election
ElectionAgrowon

Nagpur News : देशात लोकसभेच्या १०२ मतदार संघांसाठी उद्या (ता.१९) पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पाच मतदार संघांचा समावेश असून, हे पाचही मतदार संघ पूर्व विदर्भातील आहेत. या पाचही लोकसभा मतदार संघांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांनी जोर लावला असून, दोघांनीही विजयाचा दावा केला आहे. परिणामी, या मतदार संघांमध्ये चुरस वाढली आहे.

नागपूर लोकसभा मतदार संघातून देशभरात ‘रोडकरी’ अशी ओळख असलेले भाजपचे नेते नितीन गडकरी मैदानात आहेत. त्यांच्याविरोधात त्याच तोडीचा उमेदवार देण्याची गरज होती. माजी विधान परिषद सदस्य विकास ठाकरे यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली. नागपुरातील जातीय समीकरणे ही विकास ठाकरे यांची जमेची बाजू आहे.

Election
Loksabha Election 2024 : लोकशाहीचा उत्सव करूया यशस्वी

दुसरीकडे विकासकामे ही गडकरींची भक्‍कम बाजू ठरत आहे. तरीसुद्धा दोन्ही उमेदवारांनी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठी-भेटींवर भर दिला आहे. ‘निवडणुकीच्या पूर्वी मी प्रचार करणार नाही, माझी विकासकामेच मला विजयी करतील,’ असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला होता. या वेळी मात्र ते झोकून देत प्रचारात उतरले आहेत. त्यावरूनच ही लढाई दोन्ही उमेदवारांसाठी सोपी नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

चंद्रपूरमध्ये विद्यमान वनमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच माजी खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांच्यात ही लढत आहे. भंडारा-गोंदिया मतदार संघात काँग्रेसचे प्रशांत पाडोळे व भाजपचे परिणय फुके यांच्यात लढत आहे. गडचिरोली-चिमूर मतदार संघात काँग्रेसचे नामदेव किरसान व भाजपचे अशोक नेते यांच्यातील लढतही चुरशीची होणार आहे.

Election
Loksabha Election 2024 : पहिल्या टप्प्यासाठी १० हजार मतदान केंद्रे

रामटेक मतदार संघात शिवसेना (शिंदे गट) उमेदवार राजू पारवे तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे राजू बर्वे यांच्यात थेट लढत होणार आहे. विदर्भातील राजकारणाच्या दृष्टीने हे पाचही लोकसभा मतदार संघ महत्त्वाचे मानले जातात.

मोदी-शहा-राहुल गांधी यांच्या सभा

काँग्रेस उमेदवारासाठी साकोली (भंडारा) येथे राहुल गांधी यांची सभा नुकतीच पार पडली. याच ठिकाणी त्यानंतर भाजप नेते व गृहमंत्री अमित शहा यांची सभा झाली. पंतप्रधान मोदी यांची चंद्रपूर व रामटेक लोकसभा मतदार संघात सभा झाली. त्यामुळेच आता मतदारांचा कौल कोणाला मिळतो हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com