Sanjay Mandlik : बिद्री साखर कारखान्यात प्रकाश आबिटकरांना मंडलिकांची साथ, केपी पाटीलांच्या अडचणी वाढणार?

Bidri Sugar Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल ६० हजारांपेक्षा जास्त असलेल्या दूधगंगा वेदगंगा (बिद्री) सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत रंगत वाढत चालली आहे.
Sanjay Mandlik bidri sugar
Sanjay Mandlik bidri sugaragrowon
Published on
Updated on

Bidri Sugar Factory Election : कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल ६० हजारांपेक्षा जास्त असलेल्या दूधगंगा वेदगंगा (बिद्री) सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत रंगत वाढत चालली आहे. राधानगरी आणि कागल तालुक्यात सभासद संख्या असलेल्या बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीतून ही एकप्रकारे विधासभेची रंगीत तालीम असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान माजी आमदार के.पी. पाटील यांच्या विरोधात विद्यमान आमदार प्रकाश आबीटकर यांनी कंबर कसली आहे. आमदार आबीटकर यांना आता खासदार संजय मंडलिक यांनी साथ दिल्याने ही निवडणूक वेगळ्या वळणावर आली आहे. खासदार संजय मंडलिक यांनी आमदार प्रकाश आबीटकर यांच्यासोबत असल्याचे सांगत सत्ताधारी गटावर जोरदार हल्लाबोल केला.

यावेळी खासदार मंडलिक यांनी के. पी. पाटील यांच्यावर जोरदार आरोप केले. ते म्हणाले की, कागल तालुक्यातील शाहू, हमीदवाडा साखर कारखान्यांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्याचप्रमाणे बिद्रीसुद्धा बिनविरोध करण्यासाठी आमचा प्रस्ताव होता. मात्र, हुकूमशाही पद्धतीने कारभार करणाऱ्या के. पी. पाटील यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यांच्या कारभाराचा पंचनामा सुरू आहे.

सभासद या कारभाराला कंटाळले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत आमदार प्रकाश आबिटकर हे घेत असलेल्या निर्णयात कागल तालुक्यातील मंडलिक गट ताकदीने साथ देईल व बिद्रीत निश्चितच परिवर्तन घडवून आणील असा विश्वास खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केला.

Sanjay Mandlik bidri sugar
Bhogawati And Bidri Sugar Factory : विधानसभेची रंगीत तालीम! भोगावती आणि बिद्री साखर कारखान्याच्या मतदानाची तारीख ठरली

बिद्री (ता. कागल) येथे गट क्रमांक ३ व ४ मधील सभासद शेतकरी मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले स्व. खा. सदाशिवराव मंडलिक व विक्रमसिंह घाटगे यांनी आपले कारखाने उतम चालवलेत अनेक पुरस्कारही मिळवले. मात्र, त्यांचा गाजावाजा केला नाही. मात्र, बिद्रीचे अध्यक्ष के. पी. पाटील 'लै भारी'चे तुणतुणे वाजवतात. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ३२०९ रुपये दर दिला आहे. त्यांनी भ्रष्टाचार करून

स्वतःचे घर भरण्याचे काम केले आहे. मेळाव्यास गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे, मारुतीराव जाधव, अशोक फराकटे, मसू पाटील, राजेखान जमादार, कल्याणराव निकम, दतात्रय उगले, सत्यजित पाटील, अरुण जाधव, विजय बलुगडे, सुभाष पाटील, नंदकुमार पाटील, अमर पाटील, शहाजी गायकवाड, तानाजी पाटील आदि उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com