Uddhav Thackeray Agrowon
ॲग्रो विशेष

Uddhav Thackeray : 'हिंमत असेल तर स्वामीनाथन आयोग अहवालाची अमंलबजावणी करा' : उद्धव ठाकरे यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Bharat Ratna Award : देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारत रत्नची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यंदा भारत रत्न हा पाच जणांना देण्यात येणार आहे. ज्यात हरित क्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन यांच्याही नावाचा समावेश आहे. यावरून उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

Aslam Abdul Shanedivan

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांच्या आधी देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारत रत्नची घोषणा केली होती. त्यांनी, लालकृष्ण आडवाणी आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांच्या नावाची घोषणा होती. त्यापाठोपाठ मोदी यांनी शुक्रवारी (९ रोजी) माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग, नरसिंह राव आणि हरित क्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन यांच्या नावाची घोषणा केली. यावरून आता राजकारण सुरू झाले आहे. दरम्यान संसदेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तर पत्रकार परिषदेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर यावरून हल्ला बोल केला आहे. उद्धव ठाकरे यांनी डॉ. एमएस स्वामीनाथन यांच्यावरून भाजपवर निषाणा साधला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या डॉ. एमएस स्वामीनाथन यांच्या नावाच्या घोषणेवरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी, डॉ. एमएस स्वामीनाथन यांना पुरस्कार देण्याआधी केंद्र सरकारमध्ये हिंमत असेल तर स्वामीनाथन आयोगाच्या अहवालाची अमंलबजावणी करावी, असे आव्हान दिले आहे. 

दरम्यान त्यांनी अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येवरून देखील राज्यातील शिंदे सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तिखट टीका केली. त्यांनी, फडणवीस हे सुसंस्कृत नसून मनोरुग्ण गृहमंत्री आहेत, असे म्हटले आहे. तसेच ते निर्ढावलेले असून त्यांच्यावर सर्वांच्या जीवाची जबाबदारी आहे. मात्र ते दिल्लीलश्वरांसमोर शेपटी हलवता असा घणाघात ठाकरे यांनी केला आहे.

तसेच विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी, माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव आणि चरण सिंग, हरितक्रांतीचे प्रणेते एमएस स्वामीनाथन यांना भारतरत्न देण्याच्या मोदी सरकारच्या घोषणेचे काँग्रेस स्वागत करते असे म्हटले आहे. 

तर जयंत चौधरी त्यांचे आजोबा चौधरी चरणसिंग यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यांनी, जयंत चौधरी यांना कोणत्या नियमानुसार बोलण्याचा अधिकार दिला, असा सवाल केला. तसेच त्यांनी भारतरत्नसाठी सौदेबाजी केली जात असल्याचा देखील आरोप केला आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain: मराठवाड्यात २ दिवस पावसाचा अंदाज; मध्य महाराष्ट्र, कोकणातही काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

Sangli Rainfall: सांगली जिल्ह्यात पावसाची टक्केवारी घटली

Local Body Elections: आता दिवाळीनंतरच होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका; राज्य निवडणूक आयोग

Transformer Issues: बागायती पिकांत सिंचनास वेग, अनेक रोहित्र नादुरुस्त

Crop Insurance: जळगावात कापूस पीकविमा परतावा प्रलंबित

SCROLL FOR NEXT