sandeep Shirguppe
एकनाथ शिंदे गटालाच मूळ शिवसेना म्हणून मान्यता देत असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला.
शिवसेनेची स्थापना केलेले बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली.
उबाठा उबाठा काय? उद्धव बाळासाहेब ठाकरे असं स्वच्छ आणि स्पष्ट नाव आहे आणि उबाठा असेल; तर होय, मी अन्यायाविरुद्ध उभा ठाकलेला आहे.
मिंध्यांची, गद्दारांची शिवसेना... महाराष्ट्रातली आणि देशातली जनता मानणार नाही!
आमची घटना तुम्ही ग्राह्य धरत नसाल, तर तुम्ही आम्हाला अपात्र का नाही केलं?
पक्षांतर कायदा मजबूत करण्याऐवजी; पक्षांतर कसं करावं अथवा पक्षांतराचा राजमार्ग कसा असायला पाहिजे, हे त्यांनी आज दाखवून दिलं !
आजही त्यांच्यात हिंमत नाही, ते स्वतःच्या ताकदीवर मतं मागू शकत नाहीत; म्हणून त्यांना माझा पक्ष आणि वडिलांचा चेहरा लागतो.
देशातली लोकशाही ह्यांनी पायदळी तुडवली. आता सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्व शिल्लक राहणार का, हे सर्वोच्च न्यायालयाने ठरवावं!
मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण करून आपण शिवसेना संपवू, असं त्यांना वाटत होतं. पण शिवसेना काही संपणार नाही.
आमच्या मागे महाशक्ती आहे, आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला जुमानत नाही', हे आजच्या त्यांच्या निकालातून स्पष्ट झाले आहे.