Animal Husbandry Agrowon
ॲग्रो विशेष

Animal Husbandry : सुदृढ आरोग्यासाठी चारा, पाणी व्यवस्थापनावर भर

विकास गाढवे

Water Management for Livestock :

शेतकरी नियोजन

गाई-म्हैसपालन

शेतकरी : अशोक विठ्ठलराव नाडे

गाव : मुरूड, ता. जि. लातूर

एकूण जनावरे : १४ (गायी ४, म्हशी ९,बैल १)

मुरूड, (ता. जि. लातूर) शिवारात अंबाजोगाई

रस्त्यालगत अशोक विठ्ठलराव नाडे यांच्या कुटुंबीयांची अडीच एकर शेती आहे. शेतामध्ये ऊस व सोयाबीन पिकांसह रेशीम शेतीसाठी तुती लागवड केली आहे. शेती कमी क्षेत्र असल्यामुळे जोडधंदा म्हणून अशोक यांनी चार वर्षांपूर्वी दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली. एका म्हशीपासून सुरू केलेल्या पशुपालन व्यवसायाचा हळूहळू विस्तार होत गेला. दुग्ध व्यवसायामुळे कुटुंबाच्या आर्थिक नियोजनात मोठा हातभार लागला आहे. तसेच रेशीम शेतीसाठी भांडवल उपलब्ध होण्यासह मदत झाली आहे, असे अशोक नाडे यांनी सांगितले.

जनावरांच्या संगोपनासाठी तीन शेड त्यांनी उभारले आहेत. सध्या त्यांच्याकडे चार संकरित गाई व नऊ म्हशी आहेत. गाई व म्हशींपासून दररोज ६५ लिटर दूध उत्पादन मिळते. सहकारी व खासगी डेअरीला दुधाची विक्री केली जाते.

आगामी काळात गोठ्यात जातीवंत गाई-म्हशींची संख्या वाढविण्याचा विचार आहे. तसेच दूध काढण्यासाठी मिल्किंग मशीनची खरेदी करण्याचे नियोजित आहे.

दैनंदिन व्यवस्थापन

गाई आणि म्हशींच्या संगोपनासाठी एकूण तीन शेड उभारली आहेत. शेडचा आकार अनुक्रमे ३५ बाय २५ फूट, ५० बाय १२ फूट व १६ बाय ४० फूट असा आहे.

म्हशीसाठी हेड टू हेड प्रकारचे, तर गाईसाठी सिमेंटची गव्हाण बांधली आहे.

दररोज सकाळी पाच वाजता शेडीमधील कामांस सुरुवात होते. सुरुवातीला गोठ्यातील सर्व शेण बाजूला काढून स्वच्छता केली जाते.

त्यानंतर जनावरांना खुराक दिला जातो. सर्व जनावरांचे दूध हाताने काढण्यास प्राधान्य दिले जाते. उत्पादित सर्व दूध मुरूड येथील खासगी व सहकारी डेअरीला विक्रीसाठी पाठविले जाते.

गोठ्यातून उपलब्ध होणारे शेण दररोज गोळा करून ते गोठ्याच्या बाजूला काढलेल्या खड्ड्यात टाकले जाते. दरवर्षी साधारण २० ट्रॉली शेणखत उपलब्ध होते. त्यापैकी दहा ट्रॉली शेणखताचा वापर स्वतःच्या शेतामध्ये केला जातो. तर उर्वरित शेणखताची प्रति ट्रॉली पाच हजार रुपये दराने विक्री केली जाते.

आरोग्य व्यवस्थापन

गोठ्यातील प्रत्येक जनावरला पशुवैद्यकांच्या सल्ल्याने नियमितपणे लसीकरण केले जाते. त्यामुळे जनावरे आजारी पडण्याची शक्यता कमी होण्यास मदत झाली आहे.

विविध साथीच्या आजारांची बाधा जनावरांना होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यावर भर दिला जातो.

दररोज जनावरांचे निरिक्षण केले जाते. एखादे जनावर काही वेगळी लक्षणे दाखवत असेल, तर त्याचे स्वतंत्र व्यवस्थापन केले जाते. त्यानंतर त्वरित पशुवैद्यकांना माहिती देऊन आवश्यकतेनुसार उपचार केले जातात.

दुग्ध उत्पादन व विक्री

दुधाची ग्राहकांना थेट विक्री करण्यासाठी सध्या पुरेसे मनुष्यबळ नाहीये. त्यामुळे दररोज दूध संकलन केंद्रात दुधाची विक्री केली जाते. गाईंपासून २५ लिटर आणि म्हशींपासून ४० लिटर असे प्रतिदिन ६५ लिटर दूध उत्पादन मिळते. गोठ्यातील सर्व जनावरांचे दूध स्वतः अशोक नाडे काढतात. आगामी काळात जनावरांची संख्या वाढवण्याचे नियोजित आहे. त्यामुळे दूध काढण्यासाठी मिल्किंग मशिनची खरेदी करणार असल्याचे अशोकराव सांगतात.

चारा, पाणी व्यवस्थापन

जनावरांचे आरोग्य आणि दूध उत्पादनात सातत्य राखण्यासाठी चारा आणि पाणी व्यवस्थापनावर विशेष भर दिला जातो.

जनावरांना पुरेशा प्रमाणात दररोज चारा मिळेल तसेच पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची उपलब्धता केली जाते. त्यामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

गोठ्यातील प्रत्येक जनावरांचे नियमित निरीक्षण करून त्यांना आवश्यकतेनुसार चारा व पाणी देण्याचे प्रयत्न केले जातात.

प्रतिदिन जनावरांना प्रत्येक घास, वाडे, वैरण व भुसकट दिले जाते. सोबतच पशुखाद्य देखील दिले जाते.

जनावरांना पिण्यासाठी शुद्ध पाण्याची उपलब्धता होण्यासाठी सुमारे तीन हजार लिटर क्षमतेचा हौद बांधला आहे. शिवाय १ हजार लिटरचा एक ड्रम व सहाशे लिटरच्या तीन टाक्या आहेत.

जनावरांना हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी अर्धा एकर क्षेत्रात घास व चारा पिकांची लागवड केली आहे.

गोठ्यातील जनावरे बाहेर चरण्यासाठी पाठविली जात नाहीत. गोठ्यामध्येच जनावरांना पुरेशा प्रमाणात खाद्याचा पुरवठा केला जातो.

वेळोवेळी गव्हाण आणि पाणी पिण्याच्या टाक्यांची स्वच्छता केली जाते. त्यामुळे जनावरांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

- अशोक नाडे ९७६४३९१०७४, ९३०९१०३३५५

(शब्दांकन : विकास गाढवे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chana Sowing : हरभरा पेरणीच्या क्षेत्रात वाढ होणार

Pesticide residues found in farmer's urine : धक्कादायक! तेलंगणाच्या काही शेतकऱ्यांच्या लघवीत कीटकनाशकांचे अंश?

Agriculture Department : कृषी कार्यालयाचा कारभार कुबड्यांवर

Hilsa Fish Export : बांगलादेशने हिलसा माशाच्या निर्यातीवरील बंदी उठवली; भारतला ३ हजार टन मासा करणार निर्यात

Irrigation Subsidy : सिंचन अनुदानाच्या वाटपासाठी शेतकऱ्यांच्या नशिबी प्रतीक्षाच

SCROLL FOR NEXT