Grape Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Variety : द्राक्षाच्या नव्या वाणांच्या आयातीसाठी केंद्राकडे पाठपुरावा

Grape Farming : गुणवत्तापूर्ण आणि अधिक उत्पादनक्षम द्राक्षांची परदेशातील नवीन वाणे आयात करण्याबाबत केंद्र सरकारकडे आम्ही मागणी केली आहे, त्याचा पाठपुरावाही सतत सुरू आहे.

Team Agrowon

Solapur News : गुणवत्तापूर्ण आणि अधिक उत्पादनक्षम द्राक्षांची परदेशातील नवीन वाणे आयात करण्याबाबत केंद्र सरकारकडे आम्ही मागणी केली आहे, त्याचा पाठपुरावाही सतत सुरू आहे. लवकरच द्राक्षाची नवी वाणे मिळतील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले यांनी शनिवारी (ता. १९) दिली.

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीने द्राक्षाची ऑक्टोबर छाटणी या विषयावरील चर्चासत्रात श्री. भोसले बोलत होते. संचालक महादेव चाकोते अध्यक्षस्थानी होते. राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष मारुती चव्हाण, खजिनदार शिवाजीराव पवार, महेंद्र शाहीर, तुकाराम माळी, विभागीय अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, सचिव शंकर येणगुरे, आशिष काळे, व्यवस्थापक दिलीप माने उपस्थित होते.

श्री. भोसले म्हणाले, की द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी संघ कायम कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी साडेसात एचपीपर्यंत सौरपंप पुरवण्यासाठी सरकारने सवलत दिली आहे. पण ती दहा एचपीपर्यंत करावी, कांदा चाळीसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाप्रमाणेच बेदाणाशेडसाठी अनुदान द्यावे, या मागण्या राज्य सरकारकडे केल्या आहेत.

त्यावर चर्चेची एक बैठकही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे झाली आहे. आता निवडणूक आचारसंहितेमुळे हा विषय तूर्त थांबला आहे, पण यापुढेही आम्ही त्याचाही पाठपुरावा करू, असेही भोसले म्हणाले.

संघाचे खजिनदार शिवाजीराव पवार यांनी द्राक्षशेती वरचेवर महागडी होत आहे, उत्पादन खर्च वाढतो आहे, कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी गुणवत्तेची द्राक्ष वाणे आवश्यक असून त्यासाठी संघ म्हणून आम्ही पाठपुरावा करत आहोत, अशी माहिती दिली. शंकर येणगुरे यांनी सूत्रसंचालन केले.

शास्त्रज्ञांची तांत्रिक सत्रे

या चर्चासत्रात ऑक्टोबर छाटणी आणि त्यानंतरचे व्यवस्थापन, खत व पाणी व्यवस्थापन, विस्तार व्यवस्थापन, संजीवकांचा वापर, कीड व रोग नियंत्रण, प्रयोगशाळेतील माती, पाणी आणि देठ तपासणीचे महत्त्व या विषयावर राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणेचे शास्त्रज्ञ डॉ. आर. जी. सोमकुँवर, डॉ.एस. डी. रामटेके, डॉ. सुजॅाय सहा, डॉ. डी. एस. यादव तसेच बागायतदार विजय जाधव, प्रतीक मोरे यांनी मार्गदर्शन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parbhani DCC Bank Election: परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ८ जागांचे निकाल जाहीर

CSC Crop Insurance Services: विमा हप्त्याव्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क देऊ नका : दत्तकुमार कळसाईत

Paddy Transplantation: डहाणू तालुक्यात पावसाच्या विश्रांतीने बळीराजा शिवारात

Road Widening Project: मोहोळ-वळसंग रस्ता रुंदीकरणासाठी ९२ हेक्टर जमिनीचे होणार भूसंपादन

MIDC Industries Face Warning: शेतीचे नुकसान; रासायनिक कंपन्यांना इशारा

SCROLL FOR NEXT