Grape Harvest Season : आगाप द्राक्ष हंगाम काढणीचा ‘श्रीगणेशा’

Grape Farming : चालू हंगामातील पहिल्या द्राक्ष खुड्याचा मान बिजोटे (ता. सटाणा) येथील शेतकरी जयवंत जाधव यांना मिळाला आहे. निर्यातदरांकडून शिवारखरेदी सुरू झाली असून, मुहूर्ताला प्रतिकिलो १२५ रुपयांचा दर मिळाला आहे.
Grape Farming
Grape Farming Agrowon
Published on
Updated on

Nashik News : गेल्या पाच वर्षांत कसमादे भागात आगाप द्राक्ष उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी अनेक चढ-उतार पाहिले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी बागा टिकवल्या आहेत. चालू हंगामातील पहिल्या द्राक्ष खुड्याचा मान बिजोटे (ता. सटाणा) येथील शेतकरी जयवंत जाधव यांना मिळाला आहे. निर्यातदरांकडून शिवारखरेदी सुरू झाली असून, मुहूर्ताला प्रतिकिलो १२५ रुपयांचा दर मिळाला आहे.

गेल्या पाच वर्षांत कधी नैसर्गिक आपत्ती तर कोरोना काळात अस्थिर बाजारपेठेचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. यंदाचे हंगाम सुरळीत जाईल असे चित्र असतानाच झालेल्या जोरदार पावसामुळे बागांचे अनेक ठिकाणी नुकसान आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांनी संरक्षित शेतीचा अवलंब करत क्रॉप कव्हर बसवले अशा क्षेत्रांमध्ये तुलनेत नुकसान कमी दिसून येत आहे. यंदाही प्रयोगशीलता आणि धाडसी वृत्तीने पूर्वहंगामी उत्पादन घेत द्राक्षांचे खुडे सुरू झाले आहेत.

Grape Farming
Grape Farming Management : पाऊस, गारपीटग्रस्त बागेचे व्यवस्थापन

‘अधिक जोखीम अधिक दर’ असे द्राक्ष उत्पन्नाच्या परताव्याचे सूत्र असणाऱ्या या द्राक्ष काढणीची लगबग सुरू झाली आहे. मात्र आगाप द्राक्ष काढणीला असताना पावसाने काही ठिकाणी घात केला. मात्र बाजारात सध्या मागणी चांगली असल्याने मुहूर्ताला चांगले दर मिळाले आहेत. तर पुढेही द्राक्ष टप्प्याटप्प्याने बाजारात येणार असून दर टिकून राहतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

Grape Farming
Grape Farming : द्राक्ष बागेत चिखलामुळे फवारणीत अडथळे

सरासरी ११० रुपयांचा दर

आगाप द्राक्ष हंगामाची काढणी सुरू झाली असून सध्या कसमादे भागात उच्चांकी १२५ रुपयांनी सफेद द्राक्ष मालाचे व्यवहार झाले आहेत. त्यामध्ये किमान ९० रुपयांपासून कमाल १२५ रुपये दर आहेत. तर सरासरी ११० ते ११५ रुपयांनी मालाच्या प्रतवारीनुसार व्यवहार होत आहेत. रंगीत द्राक्षांची काढणी पुढील सप्ताहात सुरू होण्याची शक्यता आहे. त्यास या दरापेक्षा अधिक दर मिळतील, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

मागील काही वर्षांच्या तुलनेत द्राक्षाचे क्षेत्र झपाट्याने कमी झाले आहे. दीड ते दोन हजार एकर बागा होत्या त्या निम्म्याहून कमी झाल्या आहेत. द्राक्षाचे नुकसान होत असल्याने शेतकरी आता रंगीत क्रीमसन, रेड ग्लोब अशा वाणांकडे वळत आहेत.
खंडेराव शेवाळे, प्रगतिशील शेतकरी, भुयाणे, ता. सटाणा
मागील काही वर्षांच्या तुलनेत द्राक्षाचे क्षेत्र झपाट्याने कमी झाले आहे. दीड ते दोन हजार एकर बागा होत्या त्या निम्म्याहून कमी झाल्या आहेत. द्राक्षाचे नुकसान होत असल्याने शेतकरी आता रंगीत क्रीमसन, रेड ग्लोब अशा वाणांकडे वळत आहेत.
खंडेराव शेवाळे, प्रगतिशील शेतकरी, भुयाणे, ता. सटाणा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com