Foggy Climate Agrowon
ॲग्रो विशेष

Foggy Atmosphere : पुणे जिल्हयातील अनेक भागात धुक्याची चादर

Climate Change in Pune : ढलेली थंडी गहू, हरभरा पिकांसाठी पोषक असली तरी काही प्रमाणात रोग, किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.

Team Agrowon

Pune News : थंडीत चढ-उतार होत असताना जिल्ह्यात बुधवारी (ता. २९) सकाळी धुक्याची चादर पसरली होती. सकाळपासूनच वातावरणात गारवा होता. वाढलेली थंडी गहू, हरभरा पिकांसाठी पोषक असली तरी काही प्रमाणात रोग, किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरातील वातावरणात सतत बदल होत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांत पाऊस, ढगाळ वातावरणामुळे उकाडा तसेच मध्येच एक-दोन दिवस थंडी असे संमिश्र वातावरण नागरिक अनुभवत आहेत.

गेल्या चार ते पाच दिवसांपासून वातावरण बदलत आहे. अनेक भागात पाऊस पडला आहे. काही ठिकाणी गारपीटही झाली. त्यानंतर आता जिल्ह्यातील अनेक भागांत पहाटेपासून धुके पडत आहे. त्यामुळे पिकांवर दव पडत आहे.

पुणे शहरात सततच्या बदलत्या वातावरणामुळे कमाल व किमान तापमानात चढ-उतार होत आहे. किमान तापमानाचा पारा काही प्रमाणात चांगलाच घसरला होता. दिवसभर थंड वाऱ्यांमुळे थंडी जाणवली. दिवसभर हलका सूर्यप्रकाश होता. तर, संपूर्ण दिवसभर ढगाळ वातावरण आणि धुके होते.

भारतीय हवामान खात्यानुसार, पुढील एक ते दोन दिवस धुके पडण्याची शक्यता असून पाराही घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेती पिकांवर मोठ्या प्रमाणावर रोगराई येण्याची शक्यता आहे. धुक्याचा परिणाम पीक वाढीवरही होणार आहे.

परिणामी शेतकऱ्यांना फवारणीचा खर्च करावा लागेल. धुक्याचा फटका कांदा पिकालाही बसेल. पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना फवारणी करावी लागणार आहे. या अतिरिक्त खर्चामुळे भांडवली खर्चात वाढ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

औषधे, फवारणीचा खर्च वाढला

कांद्याच्या पातीवर पांढरे डाग पडल्याने उत्पादनापेक्षा औषधे, फवारणीचा खर्च वाढत आहे. त्यामुळे शेती करायची कशी, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. सध्याच्या वातावरणातील बदलाचा विपरीत परिणाम पिकांवर होत आहे.

टोमॅटो, वांगी, कोबी, फ्लॉवर, कांदापात, कोथिंबीर, मेथी, गवार या पिकांवर कीट, करपा, बोकड्या, आकसा, भुरी, मावा, तुडतुडे आदी रोगांचा प्रादुर्भाव होत आहे, अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Dealers Strike: कृषी निविष्ठा विक्रेते संपावर

Fertilizer Dealers Protest: विदर्भात कृषी विक्रेत्यांच्या संपाला शंभर टक्के प्रतिसाद

Tendu Leaf Collection: तेंदुपत्त्याच्या ३० हजार गोणींच्या संकलनाचे उद्दिष्ट

Summer Livestock Health Safety: उष्णतेच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग सतर्क

Chana Procurement: मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रांवर ९५ हजार क्विंटल हरभरा खरेदी

SCROLL FOR NEXT