Vice Chancellor Dr. Indra Mani  Agrowon
ॲग्रो विशेष

Flower Farming : पुष्पशेतीमुळे शेतकऱ्यांना स्थैर्य : डॉ. इंद्र मणी

Vice Chancellor Dr. Indra Mani : संशोधन संस्थेचा फुलशेतीत मोठे योगदान असल्याचे गौरवोद्‍गार परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी काढले.

Team Agrowon

Pune News : कृषी उत्पादनात केवळ फळे भाजीपाला यावर सीमित न राहता पुष्पशेती देखील शेतकऱ्यांना चांगले उत्पादन आणि स्थैर्य देत आहे. फुलांचा केवळ धार्मिक उपयोग होत नाही, तर आता राजकीय कारणांबरोबरच सजावटीसह विविध कारणांसाठी फुलांचा वापर वाढला आहे.

यामुळे पुष्पसंशोधन संचालनालय बाजारपेठेच्या गरजेनुसार विविध वाण विकसित करत आहेत. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. या संशोधन संस्थेचा फुलशेतीत मोठे योगदान असल्याचे गौरवोद्‍गार परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी काढले.

पुष्पसंशोधन संचालनालयाच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी (ता.१०) मांजरी (हडपसर) येथील मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात डॉ. इंद्र मणी बोलत होते. या वेळी राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. विजय महाजन, राष्ट्रीय जैविक ताण संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. के. स्वामी रेड्डी, अटारीचे संचालक डॉ. ए. के. रॉय, पुष्पसंशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. मिश्रा म्हणाले, की पूर्वी विविध संशोधन संस्था ‘एकला चलो रे’सारखे काम करत होते. मात्र आता सर्व संशोधन संस्था एकमेकांच्या सहकार्याने आणि समन्वयाने काम करीत आहेत. हे काम आता केवळ वर्किंग न राहता नेटवर्किंग झाले पाहिजे. आपले संशोधन शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोचले पाहिजे.

यासाठी सर्व संशोधन संस्था आणि संशोधक कार्यरत आहेत. आपण सर्व शेतकऱ्यांसाठी काम करीतच आहोतच, पण आता शेतकऱ्यांसोबत काम करण्याची गरज आहे. यासाठी मी विद्यापाठीतील शास्त्रज्ञांना महिन्याच्या पहिल्या बुधवारी शेतकऱ्यांच्या सोबत संपूर्ण एक दिवस काम करण्याची संकल्पना राबवीत आहे.

राष्ट्रीय जैविक ताण संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. के. स्वामी रेड्डी म्हणाले, की जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलांच्या परिणामांमुळे पर्यावरण, मानवी आरोग्य, पशुधन, मत्स्य आणि शेती पिकांवर मोठा ताण आला आहे. यामध्ये अवकाळी पाऊस, गारपीट, तापमानातील मोठ्या प्रमाणावरील चढ-उतार यामुळे जैविक ताण वाढला आहे.

कीड-रोगांचा होणारा ताण औषधांनी नियंत्रित करू शकतो. मात्र अजैविक ताणांवर सर्वच पातळ्यांवर संशोधन होण्याची गरज आहे. आम्ही पुष्पसंशोधन संचालनालयासोबत फुलांवर होणार वायू आणि पाण्याच्या प्रदूषणाचा परिणाम यावर कोल्हापूर येथे संशोधन करीत आहोत. यातून अनेक बाबी समोर आल्या आहेत. त्यावर उपाययोजना आखत आहोत.

या वेळी डॉ. विजय महाजन यांच्यासह विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. तर गुलाब आणि शेवंतीवर येणाऱ्या कीड-रोग व्यवस्थापनाच्या घडी पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांसह शिवार फेरी करण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bank Note Exchange: जिल्हा बँकांच्या नोटाबदलीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पडून

PM DhanDhanaya Yojana: ‘पीएम धनधान्य कृषी योजने’ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Maize Production: जागतिक पातळीवर विक्रमी मका उत्पादन?

Maharashtra Rain Alert: विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा

Crop Insurance Scam: विमा कंपन्यांकडून अधिकाऱ्यांना घोटाळ्यासाठी कमिशन; एसआयटी चौकशीची आमदार धसांनी केली मागणी

SCROLL FOR NEXT