Flood Agrowon
ॲग्रो विशेष

Northeast India Floods: ईशान्य राज्यांमध्ये पूर, भूस्खलनामुळे स्थिती बिकटच

Flood Update: ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनाने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मणिपूर, मिझोराम, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश व आसाममध्ये लाखो नागरिकांना फटका बसला असून केंद्र सरकारने मदतीचं आश्वासन दिलं आहे.

Team Agrowon

Guwahati News : ईशान्येकडील राज्यांची परिस्थिती बिकटच असून आसाम, सिक्कीम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूरमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. मणिपूरमध्ये नद्यांची पातळी वाढली असून, पाणी गावात शिरल्याने सुमारे ५६ हजार जणांना फटका बसला आहे. मणिपूरमध्ये महापुरामुळे किमान साडे दहा हजार घरांची हानी झाली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाम आणि सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून केंद्राकडून आवश्‍यक ती मदत करण्याचे आश्‍वासन दिले.

मणिपूरमध्ये पुराचा सर्वाधिक फटका इम्फाळ पूर्व जिल्ह्याला बसला असून या ठिकाणी नदीत वाहून गेल्याने एक जण बेपत्ता झाला तर पूरग्रस्त भागातील २९१३ जणांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले.

कोंबगा नदीने पातळी ओलांडलेली असताना आता इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील बाशिखोंग येथे नदीने पातळी ओलांडली. पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी किमान ५७ शिबिरे सुरू करण्यात आले असून, त्यातील बहुतांश इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील आहेत. गेल्या पाच दिवसांत संपूर्ण राज्यात भूस्खलनाच्या ९३ घटना घडल्या.

राजधानी इम्फाळच्या अनेक भागात आणि इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील अनेक भाग जलमय झाले आहेत. खुरई, हेइगंग, चेकोन भागात नदीची पातळी वाढल्याने पुराचे पाणी गावात शिरले आहे. घटनास्थळी बचावकार्य वेगात सुरू असून आपत्ती व्यवस्थापनाच्या तुकड्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेत आहेत.

मिझोराममध्ये मुसळधार

एजॉल : मिझोराममध्ये गेल्या दहा दिवसांत मुसळधार पावसामुळे भूस्खलन, घरांची पडझड आणि अन्य आपत्तीच्या घटना घडल्या. यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. चंफाई जिल्ह्यात भूस्खलन आणि महापुरामुळे घर कोसळून तिघांचा मृत्यू झाला तर एजॉल आणि सेरछिप जिल्ह्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.

राज्यात अनेक भागात भूस्खलनाच्या ५५२ घटना घडल्या. तर या काळात पावसामुळे १५२ घरांची पडझड झाली आहे. भूस्खलनाच्या घटनामुळे १९८ कुटुंबांनी आपले राहते घर सोडले असून अन्य ९२ जणांनी पुरामुळे सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला आहे. मिझोरामच्या एकूण ११ जिल्ह्यापैकी चंफाई जिल्ह्याला पावसाचा जबर फटका बसला आहे.

तेथे तिघांचा मृत्यू झाला असून भूस्खलनाच्या २०९ घटना, नऊ घरांची पडझड आणि चौदा कुटुंबीयांना सुरक्षित ठिकाणी नेल्याचे वृत्त आहे. गेल्या तीन दिवसांत एजॉल जिल्ह्यात २५३. ७ मिलिमीटर पाऊस पडला असून त्यानंतर ख्वाजावल जिल्ह्यात २४८.३३ मिलिमीटर, सियाहा जिल्ह्यात २४१.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. येत्या पाच दिवसांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. राज्यातील दक्षिण जिल्ह्यात अत्यावश्‍यक वस्तूंची वाहतूक करणारे शंभराहून अधिक मालट्रक सेरछिप येथे अडकून पडले आहेत.

अरुणाचल प्रदेशात सततच्या पावसामुळे महापूर आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या असून मृतांची संख्या अकरावर पोहोचली आहे. अजॉंव जिल्ह्यात भिंत कोसळल्याने एका मजुराचा मृत्यू झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Government Decision: संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेंतर्गत दिव्यांगासाठी १ हजार रुपयांची वाढ; लाभार्थ्यांना मिळणार दरमहा २,५०० रुपये

Rajkumar Patel: मेळघाटचे माजी आमदार पटेल पाचव्यांदा पक्ष बदलाच्या तयारीत?

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर सातारा गॅझेटवर सर्वांच्या नजरा; काय आहे सातारा गॅझेट?

Cyber Security: सायबर सिक्युरिटीवरून जिल्हा बँक सभेत गोंधळ

Nanded Heavy Rainfall: कोल्हापूरच्या धर्तीवर सरसकट मदतीचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT