July Monsoon Forecast: जुलै महिन्यात पाऊस अधिक

Monsoon Update: ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात २०२५ च्या मॉन्सूनमध्ये सरासरीपेक्षा १०६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. जूनमध्ये पावसात खंड असतील, पण जुलै व ऑगस्ट महिन्यांत भरपूर पाऊस पडेल, त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे नियोजन नीट करावे.
Dr Ramchandra Sable
Dr Ramchandra SableAgrowon
Published on
Updated on

Pune News: हिंदी, अरबी समुद्रातील पाण्याचे तापमान वाढत असल्याने बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. त्यामुळे मे महिन्यात अधिक पाऊस पडला आहे. जूनमध्ये १० ते १२ तारखेपर्यंत पावसाचे प्रमाण कमी असून जुलै महिन्यात ते अधिक राहील. जेथे हलक्या जमिनी आहेत, तेथे पेरण्या करू नये. मात्र, जेथे भारी जमिनी आहेत, तेथे शेतकऱ्यांनी पेरण्या कराव्यात, असे आवाहन डॉ. रामचंद्र साबळे यांनी केले.

राज्यात जून ते सप्टेंबर या कालावधीचा दीर्घकालीन पावसाचा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ व कृषी हवामान फोरम साऊथ आशियाचे संस्थापक सदस्य डॉ. रामचंद्र साबळे यांनी सोमवारी (ता. २) जाहीर केला. यंदा राज्यात सरासरीच्या १०६ टक्के पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. यामध्ये पाच टक्के कमीअधिक तफावत आढळून येईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

Dr Ramchandra Sable
Monsoon Rain: राज्यातील काही भागात पुढील ५ दिवस हलक्या ते मध्यम सरींची शक्यता

महाराष्ट्रासाठी २०२५ वर्षासाठी जून ते सप्टेंबर मॉन्सून पावसाचा अंदाज वर्तविला आहे. हा अंदाज कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषावर आधारित आहे. वाऱ्याचा वेग, सूर्यप्रकाशाचा कालावधी व तापमान कमी आढळल्याने जून, जुलै महिन्यांत पावसात अकोला, धुळे, राहुरी, परभणी, कोल्हापूर, पाडेगाव निफाड येथे मोठे खंड राहण्याची शक्यता असून दापोली, पुणे, सोलापूर, नागपूर, धुळे, जळगाव व कराड येथे खंडाचा कालावधी कमी राहण्याची शक्यता आहे. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले राहील. तर कमी दिवसात अधिक पाऊस आणि काही काळ पावसात मोठे खंड हवामानात राहतील.

राज्यातील केंद्रनिहाय जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या पावसाचा अंदाज, टक्केवारीमध्ये :

विभाग --- सरासरी पाऊस, मिमी ------पावसाचा अंदाज -- सरासरीची टक्केवारी (पाच टक्के कमीअधिक तफावत)

अकोला -- ६८३ --- ७२१ -- १०५

नागपूर -- ९५८ --- ९५८ --- १००

यवतमाळ -- ८८२ --- ८८२ -- १००

शिंदेवाही (चंद्रपूर) -- ११९१ --- ११९१ ---१००

परभणी --- ८१५ -- ९०४ --- ११०

दापोली --- ३३३९ -- ३५४७ -- १०६

Dr Ramchandra Sable
Monsoon Rain Alert: माॅन्सूनचा आज मुक्काम; राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज

निफाड --- ४३२ -- ४८९ --- ११३

धुळे --- ४८१ --- ४८१ --- १००

जळगाव -- ६४० -- ६४० --- १००

कोल्हापूर --- ७०६ -- ७१३ -- १०१

कराड --- ५७० -- ६१८ --१०८

पाडेगाव -- ३६० -- ४१८ -- ११५

सोलापूर --- ५४३ -- ५६१ -- १०३

राहुरी --- ४०६ --- ४४९ -- ११०

पुणे --- ५६६ --- ६५२ -- ११५

हवामान बदलाचे प्रमाण २०३० पर्यंत वाढणार

आशिया खंडात जवळपास वनाचे ६० टक्के क्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे कार्बनडाय ऑक्साइड शोषणारी यंत्रणा कमी झाली आहे. त्यातच मानवाकडून याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे २०३० पर्यंत हवामान बदलाचे प्रमाण वाढणार आहे. त्यासाठी वाढते सोलर, इमारती, रस्ते यांचे प्रमाण वाढत असल्याने त्याचा परिणाम हवामानावर होत आहे.

यंदा पावसाळ्यात राज्यातील पाच विभागांत शंभर टक्केहून अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. पाडेगाव, पुणे येथे सर्वाधिक पाऊस पडेल. तर जून, जुलैमध्ये सात ठिकाणी पावसाचा खंड पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे योग्य नियोजन करावे.
डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ व संस्थापक सदस्य, कृषी हवामान फोरम साऊथ आशिया

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com