Groundwater leve
Groundwater leve Agrowon
ॲग्रो विशेष

Groundwater Survey : पेठमध्ये भूजल सर्वेक्षणात त्रुटी; प्रशासनाने काम थांबवले

Team Agrowon

Neral News : कर्जत तालुक्यात जलजीवन मिशनच्या (Jaljeevan Mission) माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र ठेकेदारांकडून कामे संथ गतीने सुरू असून प्रशासनाच्या नियोजनाअभावी पाणीटंचाई ‘जैसे थे’आहे.

पेठ येथे जलजीवन योजनेच्या माध्यमातून विहीर खोदण्यात आली, मात्र पाणीच न लागल्‍याने प्रशासनाकडून काम थांबवण्यात आले. अखेर योजना संकटात सापडू नये, म्हणून खोदलेली विहीर पाणी साठ्यासाठी आम्हाला नीट बांधून द्या, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ग्रामीण भागातील प्रत्येक घरात २०२४ पर्यंत नळाद्वारे पाणी पोहचवण्यासाठी केंद्र सरकारने ‘हर घर नल से जल’ ही योजना आणली. रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ही योजना राबवली जात आहे. कर्जत तालुक्यात जलजीवन मिशनच्या माध्यमातून एकूण १२९ योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. यात बहुतेक ठिकाणी कामे सुरू झाली आहेत.

तालुक्यातील अति दुर्गम भाग असलेल्या पेठ गावातही पाणी योजनेचे काम सुरू करण्यात आले. पेठ गाव डोंगरावर वसले आहे. गावात २० तर आदिवासी वाडीत २० अशी साधारण ४० घरे आहेत. आंबिवली येथून किमान ५ किमीचा डोंगराला वळसा घालून पेठला जाता येते.

तर येथून जवळच कोथळीगडावर पोहचता येते. आजवर कोथळीगडावरील पाण्याच्या कुंडावर ग्रामस्‍थ गुजराण करत आहेत. मात्र तेथून पाणी आणणे, दिवसेंदिवस जिकरीचे झाले आहे.

गावात १४ नोव्हेंबर २०२२ रोजी सुमारे ४५ लाख रुपये खर्चून जलजीवन मिशन योजनेंतर्गत काम सुरू करण्यात आले. जिल्‍हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभाग कामावर लक्ष ठेवून आहे.

कामाच्या उद्भव विहरीसाठी भूजल सर्वेक्षण विभागाने कातळ भाग असलेल्या ठिकाणी अवघ्या ३५ फुटांवर पाणी लागेल, असा अहवाल दिला. त्यामुळे ठेकेदाराने ४२ फूट विहीर खोदली, मात्र पाणी लागले नाही, तर दगड आणि धूळच निघत राहिली. अखेर लघु पाटबंधारे विभागाने काम थांबवले.

कोथळी गडावरील पाण्याचा आधार

पेठ गावात वीज पोचली असली तरी पाण्याची समस्या कायम आहे. गावासाठी दोन विहिरी आहेत. तर इतर चार ते पाच विहिरी फार्महाऊस मालकांनी त्यांच्यासाठी खोदल्या आहेत. मात्र कुठल्याच विहिरीला पाणी नाही. पूर्वी महिला कोथळीगडावरील कुंडातून पाणी आणायच्या मात्र आता जलवाहिनीद्वारे विहिरीत सोडले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export : कांदा निर्यात खुली; मात्र अटी, शर्थींचा खोडा

Baramati Lok Sabha Election : नणंद की भावजय, कोण मारणार बाजी

Water Scarcity : नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती

Sugar Industry : साखर उद्योग सौरऊर्जा निर्मितीत येणार

Summer Sowing : उन्हाळी पेरणी क्षेत्रात नऊ हजार हेक्टरने घट

SCROLL FOR NEXT