Sugarcane Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Cultivation : ऊस लागवडीखालील क्षेत्र स्थिर

Sugarcane Farming : खानदेशात यंदा उसाखालील क्षेत्र स्थिरावले असून, सर्वाधिक १४ हजार हेक्टरवर नंदुरबार जिल्ह्यात उसाचे क्षेत्र आहे. त्यापाठोपाठ जळगाव जिल्ह्यात सुमारे ११ हजार हेक्टरवर ऊस आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात यंदा उसाखालील क्षेत्र स्थिरावले असून, सर्वाधिक १४ हजार हेक्टरवर नंदुरबार जिल्ह्यात उसाचे क्षेत्र आहे. त्यापाठोपाठ जळगाव जिल्ह्यात सुमारे ११ हजार हेक्टरवर ऊस आहे.

धुळ्यातही सुमारे अडीच हजार हेक्टरवर ऊस पीक आहे. शिरपूर तालुक्यात उसाची अधिक लागवड झाली आहे. उसाची तोडणी यंदा वेळेत झाली. पावसाने मध्यंतरी अडथळे आले, पण तोडणी पूर्ण झाली. उसाची लागवड खानदेशात गेले तीन वर्षे स्थिर होती. परंतु सरत्या हंगामात लागवडीत काहीशी वाढ झाली आहे.

कारण भाजीपाला, केळी आदी पिके जोखमीची बनली आहेत. उसाला दरही बरे आहेत. तसेच खासगी व काही सहकारी कारखानेदेखील गाळपात जोमात काम करीत आहे. केळी, कापूस, भाजीपाला पिकांमध्ये अधिकची जोखीम आहे. यामुळे तापी, सुसरी, अनेर नदीकाठचे अनेक शेतकरी ऊस पिकाकडे वळले आहेत.

नंदुरबार जिल्ह्यात शहादा, तळोदा तालुक्यात अधिकची लागवड आहे. नंदुरबार जिल्ह्यात मागील हंगामात तीन कारखाने जोमात सुरू होते. त्यात डोकारे (ता. नवापूर) येथे आदिवासी सहकारी कारखाना, तळोदा येथे श्रीकृष्ण हा खासगी कारखाना आणि समशेरपूर (ता. नंदुरबार) येथे आयान शुगर हा खासगी कारखाना सुरू होता.

आयान कारखान्याने गाळप क्षमता वाढविली असून, हा कारखाना सरत्या हंगाम वेळेत सुरू झाला व गाळपात या कारखान्याने वेगात काम केले. शिरपुरातही दत्त अॅग्रो या लहान कारखान्याने प्रतिदिन ५०० ते ८०० टन गाळप करून साखर उत्पादन केले.

जळगाव जिल्ह्यात दोन कारखाने सुरू होते. त्यात मुक्ताईनगर येथील मुक्ताई या खासगी कारखान्यासह चहार्डी (ता. चोपडा) येथील चोपडा कारखन्याचा समावेश आहे. खानदेशात क्रमांक दोनचे ऊस गाळप मुक्ताई कारखान्याने केले.

खानदेशात सुमारे २६ लाख टन ऊसगाळप झाले आहे. मार्चअखेर गाळप बऱ्यापैकी पूर्ण झाले होते. जळगाव न्हावी (ता. यावल) येथील मधुकर सहकारी कारखानादेखील बंद होता. यामुळे जळगाव जिल्ह्यात नगर, नाशिक, औरंगाबाद जिल्ह्यांतील कारखान्यांनीदेखील उसाची तोडणी केली. चाळीसगाव तालुक्यात नगर, औरंगाबादमधील कारखान्यांनी उसतोडणी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT