Sugarcane FRP : ‘एफआरपी’ थकविणारे कारखाने कारवाईच्या रडारवर

Sugarcane Season : शेतकऱ्यांची ४४० कोटींची एफआरपी थकविणारे साखर कारखाने साखर आयुक्तालयाच्या रडारवर आहेत.
Sugarcane FRP Rate
Sugarcane FRP Rateagrowon
Published on
Updated on

Pune News : शेतकऱ्यांची ४४० कोटींची एफआरपी थकविणारे साखर कारखाने साखर आयुक्तालयाच्या रडारवर आहेत. ३० एप्रिलपर्यंत थकित एफआरपी न दिल्यास काही कारखान्यांवर जप्तीची कारवाई होण्याची शक्यता आहे.

साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार व साखर संचालक (अर्थ) यशवंत गिरी सध्या राज्यातील थकित रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) वाटपाचा गांभीर्याने आढावा घेत आहेत. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, एफआरपी देण्यात हयगय करणाऱ्या १७ साखर कारखान्यांना आयुक्तांनी काही दिवसांची मुदत दिली आहे.

Sugarcane FRP Rate
Sugarcane FRP : देशातील साखर कारखान्‍यांनी दिली ८७ टक्के एफआरपी

एफआरपी देण्यासाठी योग्य प्रयत्न चालू असलेल्या कारखान्यांबाबत आयुक्तालयाकडून कठोर भूमिका घेतली जाणार नाही. परंतु हेतुतः एफआरपी अडविणाऱ्या कारखान्यांना महसूल वसुली प्रमाणपत्र (आरआरसी) बजावलेच पाहिजे, अशी भूमिका आयुक्तांनी घेतली आहे.

“साखर आयुक्तालयाने अलीकडेच सोलापूरच्या विठ्ठल कॉर्पोरेशन या खासगी साखर कारखान्यावर आरआरसी कारवाई केली आहे. इतर कारखान्यांचा आढावा घेता थकित एफआरपीचा सध्याचा आकडा ४४० कोटींच्या पुढे आहे.

एप्रिल अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात थकित रकमा जमा करण्याबाबत आयुक्तालयाने यापूर्वीच कारखान्यांना बजावले आहे. त्यामुळे मेच्या पहिल्या आठवड्यात आयुक्तांकडून एफआरपी वाटपाचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर काही साखर कारखान्यांना ‘आरआरसी’ बजावली जाईल. ‘आरआरसी’ बजावताच जिल्हाधिकाऱ्यांच्या यंत्रणेला संबंधित कारखान्यावर जप्तीची कारवाई करून शेतकऱ्यांच्या थकित रकमा देण्याचे अधिकार मिळतात,” असे सूत्रांनी स्पष्ट केले.

Sugarcane FRP Rate
Sugarcane FRP : हंगाम संपला; तरी थकीत उसबिलांची प्रतीक्षा

शेतकऱ्यांकडून खासगी किंवा सहकारी साखर कारखान्याने ऊस खरेदी करताच पेमेंट देण्यासाठी १४ दिवसांची मुदत असते. शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात मुदतीत ‘एफआरपी’ची रक्कम जमा करण्याचे बंधन कायद्याने साखर कारखान्यांवर टाकलेले आहे.

त्यानंतरही पेमेंट न दिल्यास अशा कारखान्यांना तत्काळ नोटिसा बजावण्याचे अधिकार साखर आयुक्तालयाला आहेत. अर्थात, शेतकऱ्यांशी वैयक्तिक लेखी करार केल्यास दोन आठवड्यांच्या आत एफआरपी न दिल्यास कारखान्यांवर कारवाई न करण्याची तरतूद आहे. त्याचा लाभ राज्यातील खासगी कारखान्यांना मिळतो.

हंगाम शेवटच्या टप्प्यात

राज्याचा गाळप हंगाम आता शेवटच्या टप्प्यात आहे. “हंगाम संपताच १५ दिवसांच्या आत त्या हंगामातील प्रत्यक्ष साखर उतारा, इथेनॉल निर्मितीसाठीचा ऊस रस व पाक तसेच बी हेवी मळीच्या वापरातून किंवा विक्रीतून घटलेला साखर उतारा काढून अंतिम साखर उतारा काढावा व त्याप्रमाणे अंतिम एफआरपी द्यावी,” असेही आयुक्तालयातील सूत्रांनी स्पष्ट केले.

थोडक्यात महत्त्वाचे...

- एफआरपी वाटपाचा गांभीर्याने आढावा

- हयगय करणाऱ्या १७ कारखान्यांना काही दिवसांची मुदत

- हेतुतः एफआरपी अडविणाऱ्यांना ‘आरआरसी’ बजावणार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com