Sugarcane Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Rate : उसाला पाच हजार रुपये प्रति टनाला दर कसा देता येत नाही : रघुनाथदादा पाटील

Sugarcane Production : राज्यकर्त्यांच्या नादानपणामुळे शेतकरी प्रश्‍न बिकट होत चालले आहे. बीडची पुनरावृत्तीची वाट राज्यकर्त्यांनी पाहू नये.

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Nagar News : नगर ः
राज्यकर्त्यांच्या नादानपणामुळे शेतकरी प्रश्‍न बिकट होत चालले आहे. बीडची पुनरावृत्तीची वाट राज्यकर्त्यांनी पाहू नये. बीडमध्ये राज्यकर्त्यांची घरे जनतेने जाळली शेतकऱ्यांनी, ज्यांच्या खांद्यावर माना टाकल्या त्यांनीच शेतकऱ्यांच्या माना कापण्याचे कामे केली.

आजचे साखरेचे व इथेनॉलचे दर बघता पाच हजार रुपये प्रति टन दर कसा देता येत नाही, या बाबत कारखानदारांनी व सरकारने समोरासमोर बसून चर्चा करावी, असे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी सांगितले.

नगर जिल्हा शेतकरी संघटनेतर्फे नेवासे येथे ऊस परिषद झाली. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट, क्रांतिसिंह नानासाहेब पाटील ब्रिगेडचे अध्यक्ष शिवाजी नांदखिले, त्रिंबक भदगले, नरेंद्र काळे, हरिभाऊ तुवर, डॉ. रोहित कुलकर्णी, अमृत शिंदे (परभणी) शिवाजी लाडके (सोलापूर), लक्ष्मण पाटील सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.

या परिषदेसाठी बाबासाहेब नागोडे किरण लंघे, अशोक नागोडे, विश्‍वास मते, विजय मते भाऊसाहेब काळे, भारत गुंजाळ, गंगाराम तुवर, सागर लांडे, ॲड. बाळासाहेब कावळे, सोमनाथ औटी दत्तू निकम ललित मोटे, कैलास नागोडे आदी उपस्थित होते.

रघुनाथदादा पाटील म्हणाले, की कांद्यासारख्या पिकावर काँग्रेसने सातशे रुपये प्रति क्विंटल निर्यात मूल्य लावले होते, परंतु मोदी सरकारने त्यावर कळस करून आठशे रुपये प्रति क्विंटल निर्यात मूल्य लावून कांद्याचे भाव पाडण्याचे काम केले. राज्यातील सहकार व सहकारी साखर कारखाने २५ कुटुंबाच्या आधिपत्याखाली असून, त्यांच्या सोयीसाठी केंद्र व राज्य अंतरची अट काढत नाही.

या अटीसाठी सहकारी साखर कारखान्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी तडजोड केली. एक टन उसापासून ९० लिटर इथेनॉल तयार होते. आजचे बाजार भाव ६७ रुपये, तरी इथेनॉलचेच फक्त सहा हजार रुपये होतात २००९-१० ला एफआरपी कायदा लागू झाला, त्या वेळी रिकव्हरी बेस साडेआठ टक्के होता तो आज सव्वा दहा टक्के आहे.


लुटण्यासाठीच संघटना फोडल्या
रघुनाथदादा पाटील म्हणाले, की राज्यकर्त्यांनी शेतकरी लुटण्यासाठी शरद जोशींची शेतकरी संघटना फोडून खोत, पाशा पटेल, शेट्टींसारख्या नेत्यांना पद, प्रतिष्ठा व पैशाचे प्रलोभन दिली. शेतकऱ्याच्या अन्नात माती कालवण्याचे पाप केले. काही लोक पुढाऱ्यांची लाचारी करत आहेत.

आपले मारेकरी कोण, आपल्यावर वाईट दिवस कोणी आणले, शेतकऱ्यांना ऊस, कापूस, कांदादराच्या माध्यमातून कोणी लुटले याचा विचार करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना स्वतःच्या फायद्यासाठी तरी या लोकांपासून सावध राहिले पाहिजे. दुर्दैवाने ते होताना दिसत नाही

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT