Agriculture Pump  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Electricity : कृषी पंपाच्या पाच हजार नव्या वीज जोडण्या रखडल्या

Agriculture Pump : खानदेशात कृषी पंपांच्या सुमारे पाच हजार वीज संयोजन किंवा वीज जोडण्या प्रलंबित आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात कृषी पंपांच्या सुमारे पाच हजार वीज संयोजन किंवा वीज जोडण्या प्रलंबित आहे. त्यावर कार्यवाही गतीने होत नसल्याने अडचणी येत आहेत. शेतकरी त्यासाठी चकरा मारीत असून, प्रशासनाने दखल घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणी केली जात आहे.

खानदेशात पाण्याचे संकट सातपुड्यास अन्य भागात आहे. शेतकऱ्यांनी विहिरी, कूपनलिका केल्या आहेत. कारण अनेक प्रकल्पांमधून पाणी रब्बीसाठी मिळालेले नाही. पुढे उन्हाळ पिकांसाठी देखील पाणी उपलब्ध होणार नाही, अशी स्थिती आहे. यामुळे शेतकऱ्यांनी नव्या कूपनलिका, विहिरी घेतल्या आहेत.

या कूपनलिका, विहिरींमधून पाणी उपशासाठी विजेची गरज आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी महावितरण किंवा वीज कंपनीकडे अर्ज किंवा प्रस्ताव सादर केले आहेत. परंतु यावर संबंधित विभागात कार्यवाही होत नसल्याने अडचणी येत आहेत.

शेतकरी वीज संयोजनासाठी वीज कंपनीकडे वारंवार चकरा मारीत आहेत. परंतु दखल घेतली जात नाही. यामुळे कूपनलिका, विहिरींमधून उपसाही होत नाही. पाणी आहे, पण वीज नाही, अशी स्थिती आहे. शेतकरी जिल्हा, तालुकास्तरावरील कार्यालयात गेल्यास त्यांना संबंधित वीज उपकेंद्रातील कार्यालयात पाठविले जाते.

या कार्यालयातही समाधानकारक माहिती दिली जात नाही किंवा सहकार्य केले जात नाही. यामुळे शेतकऱ्यांना हकनाक मनस्ताप सहन करावा लागत आहे. जे अर्ज वीज संयोजनासाठी दिले आहेत, ते काही भागात गहाळ झाल्याच्या देखील तक्रारी आहेत.

जिल्हा परिषदेच्या विहिरींबाबतही कार्यवाही कमी

जिल्हा परिषदेतर्फे सिंचन विहिरी देण्यात आल्या आहेत. आदिवासी व बिगर आदिवासी भागातही जिल्हा परिषदेचे सुमारे २५ विहिरी दिल्या आहेत. या विहिरींनादेखील वीज संयोजनाची गरज आहे.

या विहिरी शासनाने दिल्या आहेत. त्यासाठी अनुदान आहे. वीज संयोजनदेखील अनुदान तत्त्वावर द्यायचे आहे. या विहिरी खोदून अनेक दिवस झाले आहेत. त्यांचे खोलीकरणही करायचे आहे. त्यासाठी विहिरीतून पाण्याचा उपसा होणे आवश्यक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT