Agriculture Electricity Issue : विहिरीत पाणी, पण विजेअभावी पिकांना देता येईना

Mahavitaran Electricity Update : विजेच्या प्रश्‍नांमुळे शेतकऱ्यांना हे पाणी पिकाला देणे शक्य नाही. महावितरणच्या कारभारामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देताना तारेवरची कसरत करावी लागते आहे.
Agriculture Electricity
Agriculture ElectricityAgrowon

Buldhana News : तालुक्यात बऱ्याच भागात सध्या विहिरींना पाणी उपलब्ध आहे. मात्र, विजेच्या प्रश्‍नांमुळे शेतकऱ्यांना हे पाणी पिकाला देणे शक्य नाही. महावितरणच्या कारभारामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देताना तारेवरची कसरत करावी लागते आहे.

शेतकऱ्यांना विजेच्या समस्यांना सातत्याने सामोरे जावे लागते. अनेक शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध आहे. मात्र, वीज वेळेत मिळत नसल्याने रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांना पाण्याची मात्रा देताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेक शेतकऱ्यांनी डिझेल इंजिन शेतात सुरू केले. याचा वेगळा खर्च होत आहे.

Agriculture Electricity
Mahavitaran Electricity : हजारो वीज ग्राहकांचा छापील बिलांना ‘बायबाय’

महावितरणकडून शेतीसाठी काही दिवस दिवसा तर काही दिवस रात्रीला वीजपुरवठा केला जातो. मात्र, सुरळीत आणि वेळेवर वीज पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांना शेतात ठिबक, तुषार सिंचन चालवले अवघड झालेले आहे.दिवसा वीज नसल्यास रात्री जागून पिकांना पाणी द्यावे लागते. वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाणी असूनही गहू, हरभरा, शाळू ज्वारी तसेच फळबागांना पाणी देताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Agriculture Electricity
Agriculture Electricity : विजेचा लपंडाव, शेतकरी मेटाकुटीस

खामगाव तालुक्यातील काळेगाव, पिंपळगावराजा, निपाणा, ढोरपगाव, बोरजवळा, भालेगाव, घाटपुरी, सुटाळा खुर्द, पारखेड, प्रिंपी देशमुख, राहुड, कुंबेफळ, हिवरा, मांडका, कंझारा, खुटपूरी, टेंभुर्णा, गारडगाव, माथणी, हिवरखेड, किन्‍ही महादेव, जनूना, जळका तेली आदि ठिकाणी विजेच्‍या समस्‍येने शेतकरी त्रस्‍त झालेले आहेत. त्‍यामुळे ही वीज समस्‍या त्वरित निकाली काढावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

काळेगाव परिसरात नव्‍याने निर्मित झालेल्‍या निम्‍न ज्ञानगंगा प्रकल्‍पामुळे गावालगत असलेल्‍या सर्व जलस्रोतांना भरपूर पाणी उपलब्‍ध आहे. पाणी असूनही विजेअभावी उपसा कसा करावा हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. महावितरणच्‍या भोंगळ कारभारामुळे उपलब्‍ध पाणी पिकांना देण्यास मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. पिकांना पाणी देण्यासाठी रात्री थंडीत जागरण करावे लागते.
जानकीराम पवार, शेतकरी, काळेगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com