Nursery Training  Agrowon
ॲग्रो विशेष

Nursery Training : मुक्त विद्यापीठात ‘आर्या’अंतर्गत तरुणांसाठी रोपवाटिका प्रशिक्षण

Nursery Business : भाजीपाल्यावर उद्भवणाऱ्या मर रोगाच्या नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात भाजीपाला कलम रोपांची मागणी वाढत आहे.

Team Agrowon

Nashik News : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील कृषी विज्ञान केंद्रातर्फे केंद्र शासनाच्या ‘आर्या’ (Attracting and Retaining of Youth in Agriculture) प्रकल्पाअंतर्गत पाच दिवसीय निवासी रोपवाटिका प्रशिक्षण पार पडले. त्यात नाशिक जिल्ह्यातील २० युवकांनी सहभाग घेतला.

जातिवंत व निरोगी रोपे कलमे पुरवठा करणाऱ्या आधुनिक रोपवाटिकांसाठी अर्धकुशल मजुरांची व कुशल मनुष्यबळाची गरज भासते. ही गरज ओळखून गेल्या वीस वर्षांपासून विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने नियमितपणे सुशिक्षित बेरोजगार युवकांना आधुनिक रोपवाटिकेचे प्रशिक्षण दिले जाते.

सध्या भाजीपाल्यावर उद्भवणाऱ्या मर रोगाच्या नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात भाजीपाला कलम रोपांची मागणी वाढत आहे. त्यानुसार भाजीपाला फळे व फूलझाडांच्या कलमांचे तसेच रोपवाटिका उभारणीसाठी लागणाऱ्या आधुनिक अभिवृद्धीगृहे, सिंचन पद्धत, कीड-रोग व्यवस्थापन, विक्री व्यवस्थापन, शासकीय योजना व प्रमाणीकरण याविषयी उद्यानविद्या विषय विशेषज्ञ हेमराज राजपूत यांनी मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणार्थींसाठी पपया नर्सरी येथे शोभिवंत झाडे), सह्याद्री फार्म येथे टिश्‍यू कल्चर लॅब तसेच दिंडोरी येथील सानप व बालाजी नर्सरी येथे भेटीचे व प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण शिबीर झाले. त्यात या प्रशिक्षणार्थींना आधुनिक भाजीपाला फळझाडे व फुलझाडे रोपवाटिकेसंदर्भात मार्गदर्शन करून प्रशिक्षण देण्यात आले.

कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रभारी प्रमुख राजाराम पाटील यांनी प्रशिक्षण समारोपप्रसंगी प्रमुख मार्गदर्शन केले. उद्यानविद्या विषय विशेषज्ञ हेमराज राजपूत यांनी प्रशिक्षणाचे समन्वयन व संयोजन केले.

प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात आले. या युवकांनी लवकरच आपली स्वतःची आधुनिक रोपवाटिका सुरू करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. प्रशिक्षणासाठी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. नितीन ठोके, विषय विशेषज्ञ डॉ. श्याम पाटील, अर्चना देशमुख, मंगेश व्यवहारे, संदीप दळवी यांचे सहकार्य लाभले.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Desi Cow Conservation : सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये देशी गोवंश पालनास महत्त्व

Crop Insurance : मराठवाड्यात केवळ १२ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

Lumpy Skin : लातूर जिल्ह्यात बारा गावांत ‘लम्पी’चा प्रादुर्भाव

Warna Dam : वारणा धरणपाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला

Radhanagari Dam : कोल्हापुरात जोरदार पाऊस,'राधानगरी'चे चार दरवाजे उघडले

SCROLL FOR NEXT