Water Pollution Agrowon
ॲग्रो विशेष

Fish Species Extinction : पाणी प्रदूषणामुळे मासळीला धोका

Water Pollution Effect on Fish Species : जलप्रदूषण वाढल्‍याने किनाऱ्याजवळ आढळणाऱ्या स्थानिक माशांच्या काही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

Team Agrowon

Uran News : उरण तालुक्‍याचा चोहोबाजूंनी विकास होत असताना तिची खाडीची मुखे भराव टाकून बुजवली जात आहेत. त्‍यातच जलप्रदूषण वाढल्‍याने किनाऱ्याजवळ आढळणाऱ्या स्थानिक माशांच्या काही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्‍यामुळे स्‍थानिक मासळी मिळणे आता दुरापास्‍त झाले असल्याने पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या मच्छीमारांना सर्वात जास्‍त फटका बसला आहे.

उरण-पनवेल परिसरातील करंजा, मोरा, हनुमान कोळीवाडा, पाणजे, खोपटा, केळवणे, वशेणी, न्हावा, गव्हाण, कोपर, उलवा, मोरावे, मोहा परिसरात मोठ्या प्रमाणावर पारंपरिक मासेमारी केली जाते. या भागात कोळी समाजाची मोठी वस्ती आहे. पारंपरिक मासेमारी हे त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे.

मात्र वाढत्या जलप्रदूषणामुळे किनाऱ्याजवळ आढळणाऱ्या स्थानिक माशांच्या काही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यातच येथील अनेक खाडीची मुख्ये भराव टाकून बुजवण्यात आली आहेत. यामुळे कांदळवनाला सर्वात मोठा फटका बसत आहे. याच कांदळवनात विविध जातींच्‍या स्‍थानिक माशांच्‍या प्रजातींची उत्‍पत्ती होत असते.

येथील खाडी किनारपट्टीवर मिळणारे बोंबील, ढोमी, मांदेली, घोळ, कलेट, कोलंबी, शिंगाली, चिंबोरी, खुबे, कालवे, निवट्या, कोलीम, बोईट, पाखट, हेकरू, तांब, मुशी, रावस, जिताडे, शेवंड, पाला, करपाल आदी माशांचे प्रकार आढळतात. हेच मासे मच्छीमारांना चांगले पैसे मिळवून देतात. मात्र आता त्‍यांचे प्रमाण घटले आहे.

परिसरात खाडीमध्ये झालेले सागरी सेतूमार्ग, टाकण्यात येणारा भराव, कांदळवनांची कत्तल यामुळे मासळी मिळणे दुरापास्त झाली आहे.
जयवंत कोळी, सामाजिक कार्यकर्ते

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT