Warna Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Warna Dam : वारणा कालव्याचे पहिले आवर्तन सुरू

Agriculture Irrigation : गत वर्षाच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये वाचलेले वारणा धरणाचे पाणी पुढे आणखी सव्वा महिना वापरता येणार आहे. गत वर्षी १७ ऑक्टोबर २०२३ रोजी धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले होते.

Team Agrowon

Sangli News : परतीच्या पावसामुळे वारणा धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी गत वर्षाच्या तुलनेत सुमारे सव्वा महिना उशिरा आली असल्याने लोकांच्या मागणीनुसार वारणा कालव्यातून ४० किलोमीटर अंतरावर रिळेपर्यंत पाणी सोडण्यात आले आहे. उजव्या कालव्याच्या गेटची पाहणी करून दोन दिवसात पाणी सोडण्याचे नियोजन आहे.

गत वर्षाच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये वाचलेले वारणा धरणाचे पाणी पुढे आणखी सव्वा महिना वापरता येणार आहे. गत वर्षी १७ ऑक्टोबर २०२३ रोजी धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले होते. यावर्षी कालव्याद्वारे पहिले आवर्तन मंगळवारपासून (ता. २६) सुरू झाल्याने शेतकरी समाधानी झाला आहे. शिराळा तालुक्यात साधारण सप्टेंबरपासून पावसाचा जोर कमी येतो.

त्यामुळे ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत धरण, पाझर तलाव यांच्या पाणी पातळीत सुमारे २० टक्क्यांपर्यंत घट येते. साधारण १५ ऑक्टोबरपासून वारणा धरणातून सिंचनासासाठी पाणी सोडण्याची लोकांची मागणी होते. या वर्षी ऑक्टोबरमध्ये परतीच्या आणि मॉन्सूनोत्तर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पिकांना पाणी मिळाल्याने या त्या शेतकऱ्यांकडून पाण्याची मागणी आली नसल्याने सव्वा महिना धरणाचा पाणीसाठा वाढून राहिला.

आता रब्बीच्या पेरण्या झाल्या असल्याने व उस, मका व इतर पिकांना पाणी हवे असल्याने पंधरा दिवसांपूर्वी वारणा नदीला पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्यानुसार वारणा धरणाची विद्युत निर्मिती सुरू करून नदीत पाणी सुरू केले आहे. वारणा नदी काठापासून दूर व कालवा परिसरात माळरानावर पाण्याची गरज असल्याने कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी केली होती.

त्यानुसार वारणा कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. ज्या ठिकाणी विहिरी, विद्युत मोटारींच्या पाण्याची सोय नाही. परंतु कालव्याचे पाणी पोहोचू शकते अशा ठिकाणच्या शेतकऱ्यांनी वारणा कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी केली आहे. त्यामुळे कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे.

वारणा धरणाची आजची स्थिती

 धरणाची पाणी साठवण क्षमता ३४.४० टीएमसी

 पाणी पातळी ६२४.९० मीटर

 पाणीसाठा ९०२.१९५ दलघमी

 सध्याचा पाणीसाठा ३१.८६ टीएमसी म्हणजे ९२.६१ टक्के

 एकूण पाऊस ३९९१ मिलिमीटर

 कालव्यातून २५० तर नदीत ५८७ असा एकूण ८३७ कुसेकने विसर्ग सुरू आहे.

प्रत्येक वर्षी १५ ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांची पाणी सोडण्याची मागणी असते. यावर्षी गत वर्षाच्या तुलनेत झालेला दुपटीहून अधिक पाऊस आणि परतीचा पाऊस यामुळे सुमारे सव्वा लोकांची पाण्याची मागणी उशिरा आली आहे. त्याच्या मागणीनुसार वारणा नदीत पाणी सोडण्यात आले असून आता वारणा कालव्यातून पाणी सोडले आहे. शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा.
- मिलिंद कीटवाडकर, सहायक अभियंता श्रेणी १

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Beed Water Planning: बीडमध्ये पुढील दहा महिन्यांच्या पाणी, चाऱ्याचे नियोजन करा : जी. श्रीकांत

Rabi Crop Variety Selection: रब्बी पिकांसाठी वाण निवड महत्त्वाची

CJP Protest: जेलमध्ये टाकले, तरी आम्ही पुन्हा येऊ : दिपके

Poultry Processing By Products: कुक्कुट प्रक्रिया उद्योगातील उप-उत्पादनांपासून मूल्यवर्धन

Crop Damage Panchnama: शेतकऱ्यांना कागदपत्रांच्या अटीत अडकवू नका; पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करा, कैलास पाटील यांची मागणी

SCROLL FOR NEXT