Warna Dam : ‘वारणा’ भरले, पाणी वाचले

Agriculture Irrigation : शिराळा तालुक्यात यंदा गतवर्षीच्या तुलनेत दुपटीहून अधिक पाऊस झाल्याने व अनेकदा मॉन्सूनोत्तर पावसाने हजेरी लावल्याने धरण, तलाव तुडुंब भरले आहेत.
Warna Dam
Warna DamAgrowon
Published on
Updated on

Sangli News : शिराळा तालुक्यात यंदा गतवर्षीच्या तुलनेत दुपटीहून अधिक पाऊस झाल्याने व अनेकदा मॉन्सूनोत्तर पावसाने हजेरी लावल्याने धरण, तलाव तुडुंब भरले आहेत. ऑक्टोबरमध्ये पिकांना मॉन्सूनोत्तर पाऊस तसेच विहिरी, ओढे यांचे पाणी उपलब्ध झाल्याने वारणा धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी गत वर्षीच्या तुलनेत यंदा महिनाभर उशिराने आली आहे.

त्यामुळे ऑक्टोबरमध्ये वाचलेले पाणी पुढे आणखी महिनाभर वापरास मिळणार आहे. सिंचनासाठी १७ ऑक्टोबर २०२३ मध्ये धरणातून पाणी सोडण्यात आले होते. शिराळा तालुक्यात साधारण सप्टेंबरपासून पावसाचा जोर कमी होतो. त्यामुळे ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत धरण, पाझर तलावांच्या पाणी पातळीत २० टक्क्यांपर्यंत घट येत असते.

साधारण १५ ऑक्टोबरपासून वारणा धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी सुरू होते. यंदा ऑक्टोबरमध्ये मॉन्सूनोत्तर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पिकांना पाणी मिळाल्याने त्या महिन्यात शेतकऱ्यांकडून मागणी आली नाही. त्यामुळे एक महिना धरणाचा पाणीसाठा वाढून राहिला.

Warna Dam
Agriculture Irrigation : ठिबक सिंचनाद्वारे उसासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन

आता वारणा नदीला पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे वारणा धरणाची विद्युतनिर्मिती सुरू करून नदीत पाणी सोडले आहे. आता कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे आली आहे. त्यानुसार पाटबंधारे विभागाकडून वारणा कालव्यातून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Warna Dam
Agriculture Irrigation : धरणापासून थेट पिकाच्या मुळापर्यंत पाणी...

सध्या लघू पाटबंधारे उपविभागाअंतर्गत शिराळा तालुक्यात ४९ पाझर तलाव, ११ सिमेंट नाला बंधारे, ५० वळण बंधारे पूर्ण क्षमतेने भरलेले असल्याने त्यांच्यातून होणाऱ्या पाण्याच्या पाझरामुळे त्या परिसरातील विहिरी, कूपनलिका, ओढे-नाले यांच्या पातळीत वाढ होत आहे. त्या ठिकाणांहून शेतकऱ्यांना पाणीउपसा करणे सहज शक्य होत आहे.

ज्या ठिकाणी विहिरी, विद्युत मोटारीच्या पाण्याची सोय नाही, मात्र कालव्याचे पाणी पोहोचू शकते, अशा ठिकाणच्या शेतकऱ्यांनी वारणा कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी केली आहे. त्यामुळे कालव्यातून पाणी सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे.

वारणा धरणाची सद्यःस्थिती

पाणी साठवण क्षमता ३४.४० टीएमसी

पाणी पातळी ६२६.६० मीटर

पाणीसाठा ९६६.०८४ दलघमी

सध्याचा पाणीसाठा ३४.११ टीएमसी (९९.१७ टक्के)

एकूण पाऊस ३९७९ मिलिमीटर

प्रतिवर्षी १५ ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांची पाणी सोडण्याची मागणी असते. यंदा झालेला दुपटीहून अधिक पाऊस आणि मॉन्सूनोत्तरचा पाऊस, यामुळे पाण्याची मागणी महिनाभर उशिरा आली आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वारणा नदीत पाणी सोडण्यात आले असून दोन दिवसांत वारणा कालव्यातून पाणी सोडले जाईल.
- मिलिंद किटवाडकर, सहायक अभियंता, श्रेणी १

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com