ZP School Agrowon
ॲग्रो विशेष

Group School : समूह शाळेचा पहिला प्रयोग नागपुरात

ZP School : शासनाने पटसंख्या कमी असलेल्या शाळांचे, समूह शाळांमध्ये रूपांतर करायचा निर्णय घेतला आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : शासनाने पटसंख्या कमी असलेल्या शाळांचे, समूह शाळांमध्ये रूपांतर करायचा निर्णय घेतला आहे. राज्यात याचा पहिला प्रयोग नागपुरात जिल्ह्यात होणार आहे. यासाठी कुही तालुक्यातील पचखेडी जिल्हा परिषद शाळेची निवड करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांचे सामाजीकरण, निकोप स्पर्धा, खिलाडू वृत्ती व सुविधा उपलब्धतेचे गोंडस कारणे देत सुविधायुक्त व मध्यवर्ती शाळांना परिसरातील २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा जोडण्याचे ठरविले आहे. त्यासाठी शाळांकडून जिल्हा परिषदेकडून प्रस्ताव मागविण्यात आला होता. त्यानंतर जिल्ह्यातील पटसंख्या कमी असलेल्या शाळांचा सर्वे शिक्षण विभागाकडून करण्यात आला होता.

जिल्हा परिषदेने प्रत्येक तालुक्यात एका शाळेची निवड करीत तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. शासनाच्या निर्णयामुळे दुर्गम भागातील गावे, वाडी-वस्ती व तांड्यावरील दीनदलित गोरगरीब व बहुजनांची मुले शिक्षणापासून वंचित ठरतील, अशी भीती अनेक सामाजिक संघटना, शिक्षक संघटना व शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली होती.

याला काहींनी समर्थनही दिले होते. त्यानंतर ही योजना थंडबस्त्यात गेली होती. परंतु आता शासनाने ही योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. समूह शाळेचा पहिला प्रयोग नागपूर जिल्ह्यात करण्यात येणार आहे. यासाठी कुही तालुक्यातील पचखेडी या जिल्हा परिषद शाळेची निवड करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, या शाळेत १ ते ८ वर्ग असून १६७ विद्यार्थी संख्या आहे. शासनाच्या धोरणानुसार एक किलोमीटरच्या आतील १ ते ५ वर्गांच्या व तीन किलोमीटर मधील ६ ते ८ वर्ग असलेल्या कमी पटाच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे या समूह शाळेत समायोजन करण्यात येणार आहे. जवळपास २०० विद्यार्थ्यांचे या समूह शाळेत समायोजन होईल.

या वर्षापासून की पुढील वर्षापासून?

शैक्षणिक सत्राची सुरुवात झाली असून समूह शाळेची निवडही करण्यात आली. त्यामुळे या वर्षापासून समूह शाळा अस्तित्वात येईल की पुढील वर्षापासून, हे अद्याप स्पष्टता नसल्याचे समजते.

विद्यार्थ्यांच्या प्रवासाची सोय काय?

विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत ने-आण करण्यासाठी व्यवस्था कशी असेल हे अद्याप स्पष्ट नाही. प्रवासाचा पैसा विद्यार्थ्यांच्या खात्यात येईल की त्यांच्यासाठी वाहन व्यवस्था करण्यात येईल, या बाबत देखील स्पष्टता नसल्याचे समजते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Uddhav Thackeray: आम्ही कोणत्याही अटीविना शेतकऱ्यांची कर्जमाफी केली- उद्धव ठाकरे

Sugarcane Crushing Season: नांदेड विभागातील २५ कारखान्यांचा पट्टा पडला

Paddy Procurement: धान्य खरेदीचे पैसे रखडले

Water Management: पाणीटंचाईच्या त्रासातून यंदा मुक्ती

Red Banana Farming: वनवासी गावात दक्षिणेतील लाल केळी

SCROLL FOR NEXT