Harshavardhan Sapkal Agrowon
ॲग्रो विशेष

Harshvardhan Sapkal: कृषिमंत्र्यांची हकालपट्टी करा

Maharashtra Minister Controversy: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना पाठिशी न घालता त्यांची हकालपट्टी करण्याची फडणवीस यांच्यात हिम्मत नाही का? असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.

बाळासाहेब पाटील

Mumbai News: महाराष्ट्राला एक मोठी राजकीय परंपरा व संस्कृती लाभलेली आहे. पण तीच धुळीस मिळवण्याचा विडा देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने उचलला आहे काय? असा प्रश्न पडला आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना पाठिशी न घालता त्यांची हकालपट्टी करण्याची फडणवीस यांच्यात हिम्मत नाही का? असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.

कृषिमंत्री कोकाटे यांच्यासंदर्भात बोलताना सपकाळ म्हणाले, की कोकाटे हे विधानसभेत ऑनलाइन रमी खेळतानाचे व्हिडिओ प्रसार माध्यमासह समाज माध्यमांवरही सर्वांनी पाहिले आहेत. शेतकरी अडचणीत आहे, अवकाळी पावसाने झालेली नुकसानभरपाई दिलेली नाही.

शेतीमालाला भाव नाही, कर्जमाफीचे आश्वासन देऊनही त्याचा निर्णय होत नाही, राज्याच्या काही भागात दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. अशा अनेक संकटाचा सामना शेतकरी करत असताना त्याकडे कोकाटे गांभिर्याने पाहात नाहीत असेच त्यांच्या कामावरून व बेताल वक्तव्यावरून दिसत आहे.

शेतकऱ्याला भिकारी म्हणालो नाही तर ‘सरकारच भिकारी आहे’, राजीनामा द्यायला मी काय विनयभंग केला आहे का? अशी मुक्ताफळे उधळून हे महाशय आपण काहीच चुकलो नाही, असे बिनधास्त सांगत आहेत. हा प्रकार निर्लज्जपणाचा कळस असून मुख्यमंत्री फडणवीस यांनाही ते जुमानत नाहीत असे त्यांच्या विधानांवरून दिसत आहे. अशा मुजोर मंत्र्याला तत्काळ घरचा रस्ता दाखवला पाहिजे.

कोकाटेंना नारळ देऊन घरी पाठवा

श्री. सपकाळ म्हणाले, की सातत्याने वादग्रस्त विधाने करून कोकाटे यांनी मंत्रिपदाची प्रतिमा मलिन केली आहे. अशा व्यक्ती मंत्रिपदावर राहणे राज्याच्या व शेतकऱ्याच्या हिताचे नाही. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण हे चिंताजनक असून महाराष्ट्राला ते भूषणावह नाही, त्यामुळे कोकाटेंचा तातडीने बंदोबस्त करा व नारळ देऊन घरी पाठवा, अशी मागणी केली.

नाशिकच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे निवेदन

नाशिक : राज्यातील शेतकरी आत्महत्या सुरूच आहेत. पीकविमा कंपन्या शेतकऱ्यांना लूटत आहेत. बियाणे महागले आहे आणि शेतीमालाचे भाव कोसळत आहेत. अशातच शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत कृषिमंत्री अधिवेशनात पत्ते खेळण्यात मग्न आहेत. त्यामुळे त्यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sudhir Munghantiwar: मुनगंटीवार यांनी विधिमंडळात उपस्थित केलेले शेतीचे प्रश्‍न ठरले लक्षवेधी 

Solar Pump Issues: सोलर पंपाच्या सक्तीने सिंचन अडचणीत

Wild Vegetable Festival: रानभाजी महोत्सवाला उत्स्फुर्त प्रतिसाद; आदिवासी उत्पादनांना ग्राहकांची पसंती

Nanded Rain: नांदेडला पावसामुळे खरिपाला जीवदान

Ujani Dam: ‘उजनी’तून भीमा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग बंद

SCROLL FOR NEXT