Manikrao Kokate Controversy: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नव्या वक्तव्याने पुन्हा वाद; राजीनाम्याच्या मागणीला जोर

AgriMinister Controversy: राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्याचे दिसते. विधान परिषदेत रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी चांगलीच टिका केली.
Manikrao Kokate
Manikrao KokateAgrowon
Published on
Updated on

थोडक्यात माहिती...

१) कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या ‘शासन भिकारी आहे’ या विधानावरून वाद उफाळला.

२) त्यांनी पत्रकार परिषदेत राजीनामा नाकारला, आणि रमी खेळल्याचेही खंडन केले.

३) मुख्यमंत्री फडणवीस आणि विरोधकांनी त्यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

४) सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

५) कोकाटेंच्या वादग्रस्त विधानामुळे कृषी खाते देण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित.

Pune News: राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्याचे दिसते. विधान परिषदेत रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी चांगलीच टिका केली. यावर आपली बाजू मांडण्यासाठी त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेतही त्यांनी केलेल्या विधानांवरून पुन्हा वाद निर्माण झाला आहे. मी शेतकऱ्यांना नाही तर सरकारला भिकारी म्हणालो, राजिनामा द्यायला मी विनयभंग केला का? अशा प्रकारची व्यक्तव्ये त्यांनी केली. यावरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वक्तव्याचा समाचार घेतला, तर सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार या विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली.

महाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज (ता. २२ ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या पत्रकार परिषदेत कृषी समृध्दी योजनेची माहीती दिली. यावेळी पत्रकारांनी त्यांच्या वादग्रस्त विधानांविषयी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्ये केली. तसेच कोकाटे यांनी सभागृहात रमी खेळल्याच्या आरोपांचे खंडन करत राजीनामा देण्यास नकार दिला.

Manikrao Kokate
Manikrao Kokate Controversy: कृषिमंत्री कोकाटे आणि वाद; ओसाड गावच्या पाटीलकीपासून रमीपर्यंत

कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, जुन्या पीकविमा योजनेत शेतकऱ्यांकडून फक्त एक रुपया घेतला जात होता. पण, त्यांनी पुढे असं विधान केलं की, "शासन शेतकऱ्यांना एक रुपया देत नव्हतं, तर शेतकऱ्यांकडून एक रुपया घेत होतं. याचा अर्थ शेतकरी भिकारी नाही, तर शासन भिकारी आहे. राजीनाम्याच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी मी कुणाचा विनयभंग केला का? का मी कुणाची चोरी केली का? शेतकऱ्यांच्या विरोधात कोणता निर्णय घेतला का? माझी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? असे प्रश्न विचारत राजीनाम्याच खंडन करणार वक्तव्ये केली.

या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "जर कृषिमंत्र्यांनी असं वक्तव्य खरंच केलं असेल, तर ते अत्यंत चुकीचं आहे. आम्ही शेतकऱ्यांना मदत करत आहोत आणि यापुढेही करू. आम्ही दरवर्षी ५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक शेतीसाठी करत आहोत. यावर्षीपासून पुढील पाच वर्षांत २५ हजार कोटी रुपये शेती क्षेत्रात गुंतवणार आहोत. अशा परिस्थितीत मंत्र्यांचं असं वक्तव्य योग्य नाही." फडणवीस यांनी कोकाटे यांच्या वक्तव्यावर स्पष्ट नापसंती दर्शवली.

Manikrao Kokate
Manikrao Kokate Controversy : शेतकरी पुत्र आहात, जबाबदारीने बोला

विरोधी पक्षांनीही या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देताना म्हटलं, "महाराष्ट्राची निर्मिती १०५ हुतात्म्यांच्या बलिदानातून झाली. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी या राज्याला घडवलं. येथील जनतेने आणि शासनकर्त्यांनी कठोर परिश्रम करून महाराष्ट्राला देशातील सर्वात समृद्ध राज्य बनवलं. अशा राज्याला 'भिकारी' म्हणणं हा राज्यातील जनतेचा आणि माजी मुख्यमंत्र्यांचा अपमान आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर असताना कृषिमंत्री असं असंवेदनशील वक्तव्य करतात, यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं? त्यांनी सभागृहात रमी खेळून शेतकऱ्यांप्रती असंवेदनशीलता दाखवली आहे. आमच्या अपेक्षा होत्या की ते या पत्रकार परिषदेत राजीनामा देतील, पण त्यांनी उलट आणखी वादग्रस्त वक्तव्य केलं. आम्ही याचा निषेध करतो आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की, शेतकऱ्यांप्रति संवेदनशील असणाऱ्या व्यक्तीकडे कृषी खातं द्यावं."

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले, "कृषिमंत्र्यांचं सभागृहात रमी खेळण्याचं प्रकरण खोटं आहे, असं त्यांचं म्हणणं धादांत खोटं आहे. सभागृहात आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरं देण्याच्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू होती, पण मंत्र्यांना त्यात रस नव्हता. आणि मला सांगा पत्त्याची कोणती जाहिरात skip करण्यासाठी ४२ सेकंद लागतात हो? त्यांनी राजीनामा द्यावा, अशी अपेक्षा होती, पण त्यांनी उलट कोर्टात जाण्याची भाषा केली. त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी जेवढा खटाटोप केला, तेवढा प्रयत्न त्यांनी शेतकऱ्यांसाठी केला असता, तर ही वेळ आली नसती."

यावर खंडन करताना माणिकराव कोकाटे म्हणाले, "मी रमी खेळलो नाही आणि भविष्यातही खेळणार नाही. असा खेळ खेळणं योग्य नाही. जर मी रमी खेळताना दिसलो, तर मी राजीनामा देईन." या सर्व प्रकरणामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उडाली आहे. कृषिमंत्र्यांच्या वक्तव्याने शेतकरी आणि जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या असून, यावर पुढे काय कारवाई होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

वारंवार विचारला जाणारा प्रश्न...

१) माणिकराव कोकाटे यांनी काय वादग्रस्त विधान केलं?
त्यांनी “शासन भिकारी आहे” असं विधान करून वाद निर्माण केला.

२) कोकाटे यांनी खरंच रमी खेळली का?
त्यांनी हे आरोप फेटाळले असून, रमी खेळल्याचे नाकारले आहे.

३) मुख्यमंत्री फडणवीस यांची भूमिका काय आहे?
त्यांनी कोकाटेंच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

४) विरोधकांची काय मागणी आहे?
विरोधकांनी कृषिमंत्र्यांचा राजीनामा देण्याची जोरदार मागणी केली आहे.

५) राजीनाम्याबाबत कोकाटेंनी काय प्रतिक्रिया दिली?
“मी विनयभंग केला का?” असे म्हणत त्यांनी राजीनामा नाकारला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com