irrigation subsidy Agrowon
ॲग्रो विशेष

Irrigation Subsidy : सिंचन अनुदान रखडल्याने आर्थिक संकट

Irrigation Scheme : बार्शी शहरासह तालुक्यातील २ हजार ६०० शेतकऱ्यांचे ठिबक, तुषार सिंचनाचे नऊ कोटी रुपयांचे अनुदान प्रलंबित आहे.

Team Agrowon

Solapur News : बार्शी शहरासह तालुक्यातील २ हजार ६०० शेतकऱ्यांचे ठिबक, तुषार सिंचनाचे नऊ कोटी रुपयांचे अनुदान प्रलंबित आहे. हे अनुदान मिळाले नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने लवकरात लवकर अनुदान वितरित करण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे.

तालुक्यात पावसाच्या लहरीपणामुळे अनेक भागात शेतीसाठी कमी-अधिक प्रमाणात पाणी मिळते. आपली शेती चांगली फुलावी, शेतमालाला चांगला दर मिळावा, यासाठी शेतकरी आटोकाट प्रयत्न करतो, परंतु मागील सहा महिन्यांपासून सिंचनाचे अनुदान शेतकऱ्यांच्या पदरात आले नसल्याने त्यांची मोठी आर्थिक कुचंबणा होत आहे.

कृषी विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी बळीराजांकडून केली जात आहे. ठिबक सिंचनासाठी एकरी सुमारे ४० ते ४५ हजार रुपये खर्च येतो, हाच खर्च तुषार सिंचनासाठी एकरी एका तुषार सिंचनाच्या संचासाठी वीस हजार रुपये खर्च येतो, तर मिनी स्प्रिंकलर सिंचनासाठी दर एकरी सुमारे ३६ हजार रुपये खर्च येतो.

अधिकृत दुकानदारांकडून हे सिंचनाचे संच शेतात बसविले जातात. अनुदान रक्कम खात्यात पडल्यानंतर शेतकऱ्यांमार्फत संबंधित दुकानदारास ती रक्कम अदा केली जाते. परंतु अनेक महिन्याच्या प्रतीक्षेनंतरही एकाही शेतकऱ्याला सिंचनाचे अनुदान मिळाले नाही. तालुक्यातील सुमारे ७० टक्के शेतकऱ्यांकडे ठिबक, तुषार अथवा मिनी स्प्रिंकलर सिंचनाच्या माध्यमातून शेती केली जाते.

तालुक्यातील २ हजार ६०० शेतकऱ्यांच्या सिंचन संचाची पाहणी झाली आहे. त्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्तावही सादर केला आहे. आमच्यामार्फत योग्य तो पाठपुरावा देखील सुरू आहे. त्यामुळे आम्ही देखील शेतकऱ्यांना पैसे मिळावे, यासाठी प्रयत्नशील आहोत. खात्यात पैसे जमा होण्यासाठी प्रतीक्षा आहे.
- संतोष कोयले, तालुका कृषी अधिकारी, बार्शी.
अनुदानाच्या भरवशावर दुकानदारांकडून शेतात सिंचनाचे संच बसवले आहेत. परंतु एकही हप्ता खात्यावर जमा झाला नाही. सरकार लाडक्या बहिणीसाठी पैसे देते, मी देखील एक शेतकरी बहीणच आहे. राज्य सरकारने त्वरित अनुदान खात्यात जमा करावे.
- दीपाली आवटे, शेतकरी,जामगाव (आ.), ता. बार्शी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT