E Peek Pahani  Agrowon
ॲग्रो विशेष

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Registration : ई-पीकपाहणी ऑनलाइन नोंदणीला ऑगस्टपासून सुरुवात झाली. सुरुवातीला सर्व्हर डाऊनची समस्या उद्भवली. त्यानंतर प्रशासनाने दखल घेऊन सर्व्हरची गती वाढविली होती.

Team Agrowon

Yavatmal News : ई-पीकपाहणी ऑनलाइन नोंदणीला ऑगस्टपासून सुरुवात झाली. सुरुवातीला सर्व्हर डाऊनची समस्या उद्भवली. त्यानंतर प्रशासनाने दखल घेऊन सर्व्हरची गती वाढविली होती. तरीसुद्धा दीड महिन्यात केवळ ५५.७५ टक्के शेतकऱ्यांनी ई-पीकपाहणी नोंदणी ऑनलाइन केली आहे. आता उर्वरित शेतकऱ्यांची नोंदणी व्हावी, याकरिता सोमवारपर्यंत (ता. २३) मुदतवाढ देण्यात आली आहे.

कृषी पतपुरवठा सुलभ होण्याकरिता शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग राहणे आवश्यक आहे. मात्र, बऱ्याचवेळा शेतकरी सक्रिय सहभागी राहत नाहीत. परिणामी, शासकीय योजनांचा लाभसुद्धा आवश्यकतेनुसार मिळत नाही. त्यामुळे शासनाने ई-पीकपाहणी नोंदणीसाठी अ‍ॅप कार्यान्वित केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी ‘रिअल टाईम क्रॉप डेटा’ संकलनासाठी ई-पीक पाहणी नोंदणी आवश्यक केली आहे.

मागिल वर्षी सोयाबीन अनुदानाचा लाभ देताना ई-पीकपाहणी नोंदणी फायदेशीर ठरली. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांची यासाठी झुंबड उडेल, अशी शक्यता होती. परंतु शेतकऱ्यांचा प्रतिसाद अद्यापही मिळाला नाही. जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात एकूण पाच लाख १५ हजार ८३३ शेतकऱ्यांनी पेरणी केली. त्यात सर्वाधिक साडेचार लाख हेक्टरवर कापूस, सव्वादोन लाख हेक्टर सोयाबीनचा पेरा आहे.

या पेऱ्याची ई-पीकपाहणी नोंदणी एक जुलैपासून झाली. या नोंदणी प्रक्रियेला शेतकऱ्यांकडून अल्प प्रतिसाद मिळाला. दीड महिन्यात केवळ ५६.७५ टक्के म्हणजे दोन लाख ८४ हजार २३३ शेतकऱ्यांच्या पाच लाख चार हजार ९९ हेक्टरची ई-पीकनोंदणी ऑनलाइन झाली आहे. आता ऑनलाइन ई-पीकपाहणी नोंदणीसाठी सोमवारपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या कालावधीत शेतकऱ्यांनी नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन महसूल विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

पहिल्या टप्प्यात सर्व्हरचा खोडा

ई-पीकपाहणी नोंदणीच्या सुरवातीलाच सर्व्हरचा खोडा निर्माण झाला होता. अनेक शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करता येत नव्हती. त्याचप्रमाणे ई-पीकपाहणीसाठी आवश्यक ज्ञानसुद्धा बहुतांश शेतकऱ्यांना नाही. अशा शेतकऱ्यांची मदत महसूल, कृषी विभागाच्या तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सहायकांनी करणे आवश्यक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT