Cotton Picking  Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Picking : शेतकरी, मजुरांमध्ये 'फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युला'

Labor Wages : खानदेशातील अनेक भागांत उशिराने लागवड करण्यात आलेल्या कापसाची वेचणी आता अंतिम टप्प्यात आहे.

Team Agrowon

Nandurbar News : खानदेशातील अनेक भागांत उशिराने लागवड करण्यात आलेल्या कापसाची वेचणी आता अंतिम टप्प्यात आहे. मात्र वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना अधिकची मजुरी द्यावी लागत असून, यात वेचणी झालेल्या कापसाच्या एकूण उत्पन्नातील निम्मे उत्पन्न मजुरांच्या हिश्श्यावर जात आहे.

एक क्विंटल कापसाची वेचणी केल्यास त्यातील निम्मा कापूस मजुरांचा असा फॉर्म्युला शेतमालक व मजुरांत होत आहे. मागील महिन्यात हा प्रकार सुरू झाला. आता काही शेतकऱ्यांचाच कापूस शेतात आहे. परंतु हा फिप्टी - फिप्टी फॉर्म्युला कायम आहे.

शेतकरी आणि मजुरांमध्ये आलेल्या एकूण उत्पनातून वाटणी होत असल्याने शेतकऱ्यांना कापूस प्रतिक्विंटल तीन हजार रुपये पडत असल्याचे सांगण्यात येत आहे. आशात कापूस पिकाला लागलेला खर्चही काढणे अवघड झाले आहे. तळोद्यातील हा फॉर्म्युला खानदेशातील सातपुड्यालगच्या अनेक गावांत पोचला आहे.

काही शेतकऱ्यांनी मात्र यास विरोध केला असून, यात शेतकऱ्यांचा तोटा आहे. हा चुकीचा प्रकार आहे, असा मुद्दा उपस्थित केला आहे. खानदेशात मजूरटंचाई कायम आहे. पुढे उष्णता वाढेल. या कालावधीत अधिकची मजूरटंचाई असेल.

दुहेरी फटका

नोव्हेंबर व अन्य कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे खानदेशात कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अशात रब्बीची तयारी शेतकऱ्यांनी केली. जेवढा येईल तेवढा कापूस काढून शेताची मशागत करून उन्हाळ पिकेही पेरली आहेत. फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

मशागत, बियाणे, मजुरी, खते, फवारणी, वेचणी या सर्वांची बेरीज करता कापूस पिकात शेतकऱ्यांना कुठलाही आर्थिक लाभ होणार नसल्याची स्थिती असून, पीक तोट्यात गेले आहे. दुसरीकडे निसर्ग फटका देत आहे. यामुळे शेतकरी हवालदील झाल्याची स्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT