Cotton Picking
Cotton Picking Agrowon

Cotton picking : स्वच्छ कापूस वेचणी करावी : डॉ. सातपुते

Dr. Usha Satpute : कापूस वेचणी स्वच्छ करावी. त्यामुळे चांगले दर मिळू शकतील.कापूस वेचणी नंतर पऱ्हाटीचे योग्य व्यवस्थापन करावे असे प्रतिपादन परभणी कृषी विज्ञान केंद्रातील विशेष प्रकल्पातील तांत्रिक प्रशिक्षक डॉ. उषा सातपुते यांनी केले.
Published on

Parbhani News : कापूस वेचणी स्वच्छ करावी. त्यामुळे चांगले दर मिळू शकतील.कापूस वेचणी नंतर पऱ्हाटीचे योग्य व्यवस्थापन करावे असे प्रतिपादन परभणी कृषी विज्ञान केंद्रातील विशेष प्रकल्पातील तांत्रिक प्रशिक्षक डॉ. उषा सातपुते यांनी केले.

नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्था व कृषी विज्ञान केंद्रातर्फे राबविण्यात येत असलेल्या विशेष कापूस प्रकल्पांतर्गत ताडबोरगाव (ता. मानवत) येथे मंगळवारी (ता. २६) दादा लाड तंत्रज्ञानाने केलेल्या कापूस लागवड प्रक्षेत्रावर विशेष प्रक्षेत्र दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी डॉ. सातपुते बोलत होत्या.

Cotton Picking
Cotton Picking Wages : कापूस वेचणी आणखी महागली

विषय विशेषज्ञ अमित तुपे, तंत्रप्रशिक्षक कुंडलिक खुपसे, नामदेव काळे आदी उपस्थित होते. डॉ. सातपुते म्हणाल्या, की कापसाच्या उत्पादन वाढी करता योग्य अंतर तसेच ४० ते ४५ दिवसांनी गळ फांदी काढून टाकणे, शेंडा खुडून ३ फुटांपर्यंत झाडांची उंची पारंपरिक पद्धतीपेक्षा कमी ठेवून फळ फांदीला योग्य प्रकारे अन्नद्रव्य मिळाल्यामुळे बोंडाची संख्या व आकार वाढवून

Cotton Picking
Cotton Picking : दोन वेचण्यांतच कपाशीच्या पऱ्हाट्या

उत्पादनात वाढ होते. पऱ्हाटीचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी अनियंत्रित पद्धतीने न जाळता पायरोलिसिस या नियंत्रित ज्वलन पद्धतीद्वारे बायोचार तयार होतो. बायोचार हा कोळशाचा एक प्रकार असून, त्यामध्ये अधिक प्रमाणात कार्बन व इतर अन्नद्रव्य असतात, तो शेतीस कशा प्रकारे उपयुक्त ठरवू शकतो.

खुपसे, कपाशीची फरदड घेणे टाळावे त्यामुळे पुढील हंगामामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळाता येईल. ताडबोरगाव, पेडगाव, देवलगाव आवचार या गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com