Raju Shetti Agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipith Highway Scam: शक्तिपीठ महामार्गाच्या कामात पन्नास हजार कोटींचा गैरव्यवहार

Raju Shetti: शक्तिपीठ महामार्गासाठी अवाढव्य ८६ हजार कोटींचा खर्च दाखवत सुमारे ५० हजार कोटींचा गैरव्यवहार केला जात असल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. लातुरातील शेतकरी परिषदेत त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

विकास गाढवे

Latur News: २८ ते ३० हजार कोटींत होऊ शकणाऱ्या महामार्गाचा खर्च ८६ हजार दाखवला जात आहे. यामुळे या महामार्गाच्या कामात ५० हजार कोटींचा गैरव्यवहार होणार आहे. म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच शक्तिपीठ महामार्ग करण्याचा निर्धार केला. यामागील रहस्य समजून घेण्याची गरज आहे, अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.

येथे मंगळवारी (ता. ८) आयोजित शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या परिषदेत ते बोलत होते. अर्थतज्ज्ञ प्रा. एस. एम. देसरडा, माजी आमदार त्र्यंबक भिसे, उमेश देशमुख, अजय बुरांडे, दासराव हंबर्डे, प्रकाश पाटील, प्रशांत मानधने, ॲड. गजेंद्र येळकर, अनिल ब्याळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. शेट्टी म्हणाले, की शक्तिपीठ महामार्गाची काहीच गरज नाही. ज्या देवस्थानांसाठी हा मार्ग तयार करण्यात येत आहे, त्या ठिकाणी कुठेही वाहतूक कोंडी होत नाही. भाविकांनी सुसज्ज रस्ता तयार करुन द्यावा, अशी मागणी केली नाही. तरीही सक्तीने हा महामार्ग करण्याचा अट्टहास कशासाठी? महामार्गाला समांतर रत्नागिरी - नागपूर महामार्ग आहे. सध्याच्या महामार्गावरील वाहतूक तुरळक आहे. एका टोलनाक्यावरून दररोज चाळीस लाखांऐवजी दहा ते ११ लाख वसुली होत आहे.

क्षमतेच्या २५ टक्केच रस्त्याचा वापर सुरू आहे. या परिस्थितीत दुसरा महामार्ग तयार करुन पहिला महामार्ग आजारी पाडायचा, डाव आहे. शक्तिपीठ महामार्गासाठीच्या अवाढव्य खर्चाकडे जनतेने लक्ष द्यायला पाहिजे. हा केवळ शेतकरी बाधितांचा प्रश्‍न नाही. रस्त्यावरून जाणाऱ्यालाही त्याची झळ पोहोचणार आहे. प्रवाशांची टोलच्या माध्यमातून लूटमार होणार आहेच. शेतकऱ्यांनी कधी विकासाला विरोध केला नाही.

याचा अर्थ शेतकऱ्यांचे थडगे बांधा अन् त्यावर विकासाचे मनोरे उभे करा, असा होत नाही. यामुळे गरज नसलेला हा महामार्ग आम्ही होऊ देणार नाही. सरकारने शेतकऱ्याशी पंगा घेण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा शेट्टी यांनी दिला. या वेळी श्री. भिसे यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. परिषदेला बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकप्रतिनिधी आणि राज्यकर्त्यांचा डाव

प्रा. एस. एम. देसरडा म्हणाले, की शक्तिपीठाचा विषय राजकीय अर्थशास्त्राचा भाग आहे. महाराष्ट्रावर कर्जाचा डोंगर आहे. या कर्जाचे व्याज फेडण्यासाठी सरकारला पुन्हा कर्ज काढावे लागत आहे. यामुळे हा महामार्ग म्हणजे काहीतरी घबाड आहे. लोकप्रतिनिधी व राज्यकर्त्यांनी जनतेची लुट व निसर्ग उद्ध्वस्त करण्याचा डाव आखला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Issue: नियतीनेच तोडला थुट्टे कुटुंबाचा ‘भरवसा’

Maharashtra Rain: राज्यात पावसाचा जोर वाढला

Kharif Sowing: खरीप पेरण्यांत बारामती उपविभाग अव्वल

Maharashtra Agriculture Minister: कृषिमंत्री कोकाटे खानदेश दौरा अर्धवट सोडून परतले

Agri Officers Support: कृषिमंत्र्यांच्या समर्थनासाठी कृषी अधिकारी सरसावले

SCROLL FOR NEXT