Fertilizer Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer Testing : चंद्रपुरात खते, बियाण्यांचे नमुने प्रयोगशाळेत पडून

Seed Testing : जिल्हा परिषद कृषी विभाग, जिल्हा अधीक्षक कृषी विभागातील गुणनियंत्रक विभागाच्या माध्यमातून खते, बियाणे आणि कीटकनाशकांचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात.

Team Agrowon

Chandrapur News : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कृषी केंद्रांतून खते, बियाणे आणि कीटकनाशकांचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. ते नागपूर आणि अमरावतीच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.

जिल्हा परिषद कृषी विभाग, जिल्हा अधीक्षक कृषी विभागातील गुणनियंत्रक विभागाच्या माध्यमातून खते, बियाणे आणि कीटकनाशकांचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात. बाराही महिने ही मोहीम चालते.

शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या खरीप हंगामात ही मोहीम अधिक तीव्र होते. जिल्हाभरात दीड हजारांवर कृषी केंद्रे आहेत. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेतील कृषी विभागाने गुणनियंत्रक विभागाच्या माध्यमातून खतांचे शंभर, बियाणे २०० आणि कीटकनाशकांचे ३५ नमुने तपासणीसाठी घेतले होते.

बियाणे नागपूर तर खते अमरावती येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. महिनाभरात त्याचा अहवाल येणे अपेक्षित होते. मात्र, या कालावधीत जिल्हा परिषदेतील कृषी विभाग, पंचायत समित्यांतील कृषी विभागाकडून खते, बियाणे आणि कीटकनाशकांच्या तपासणीचे काम काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने घेतलेल्या नमुन्यांच्या तपासणीला ब्रेक लागल्याची माहिती आहे.

नवीन योजनांचे गाजर

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे पूर्वी कृषी केंद्र परवान्याचे काम होते. मात्र, तीन-चार वर्षांपूर्वी हे काम काढून टाकण्यात आले. आता खते, बियाणे आणि कीटकनाशकांचे नमुने घेण्यावरही राज्य शासनाने बंदी घातली आहे. नवीन योजना देणार असल्याचे कृषी विभागाला सांगण्यात आले आहे. मात्र, अजूनही कृषी विभागाला नवीन योजना मिळाल्या नाहीत. त्यामुळे कृषी विभागात नाराजीचा सूर आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Copra MSP: खोबऱ्याला १२,०२७ ते १२,५०० रुपये एमएसपी; केंद्रीय मंत्रिमंडळाचा शेतकरी हिताचा महत्त्वाचा निर्णय

Soil Health: जमिनीच्या सुपीकतेसाठी सेंद्रिय घटकांचा वापर वाढविणे आवश्यक

Procurement Centers Issues: धाराशिव जिल्ह्यातील केद्रांना बारदाना मिळेना

Farmer Cup 2026: फार्मर कपसाठी कृषी विभाग सज्ज : कळसाईत

Agriculture Irrigation: वाकुर्डे, टेंभूचे रब्बीसाठी आवर्तन सुरू करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT