Turmeric Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizers Management : हळदीसाठी ठिबक सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन

Turmeric Farming : हळद पिकाच्या योग्य वाढीसाठी १८ अन्नद्रव्यांची गरज असते, पीकवाढीच्या अवस्थेनुसार शिफारशीनुसार कमी जास्त प्रमाणात प्रत्येक अन्नद्रव्य योग्य वेळी द्यावे.

Team Agrowon

अरुण देशमुख

Turmeric Farming Management : हळद पिकाच्या योग्य वाढीसाठी १८ अन्नद्रव्यांची गरज असते, पीकवाढीच्या अवस्थेनुसार शिफारशीनुसार कमी जास्त प्रमाणात प्रत्येक अन्नद्रव्य योग्य वेळी द्यावे.

हळद लागवड गादी वाफ्यावर करावी. बेणे प्रक्रिया करावी. जोड ओळीतील अंतर १ फूट आणि दोन बेण्यातील अंतर १५ सेंमी ठेवावे. लागवड खोलवर करावी. हळदीसाठी इनलाइन ठिबक पद्धतीचा वापर करावा. ठिबक नळीपेक्षा ड्रीपरची निवड महत्त्वाची असते. सर्व ठिकाणी सम प्रमाणात पाणी देणाऱ्या दाब नियंत्रित ड्रीपरचा वापर करावा. खत व्यवस्थापन करण्यापूर्वी माती परीक्षण करावे. यामुळे कोणती अन्नद्रव्ये किती प्रमाणात उपलब्ध आहेत आणि जमिनीचा सामू, खताची विद्राव्यता याच्या अहवालानुसार खताचे नियोजन करावे.

ठिबक सिंचनाद्वारे मुळाच्या कक्षेत खते दिली जातात. निचरा होत नाही. एकसमान वितरण होण्यासाठी व्हेंचुरीचा वापर करावा.

जमिनीमध्ये हवा, अन्नद्रव्ये आणि पाणी याचा योग्य समतोल राखला जातो. जमीन कायमस्वरूपी वाफसा अवस्थेत राहते. खते ग्रहण करण्याच्या क्षमतेत वाढ होते. योग्य खते योग्य वेळी दिली जातात.

कमी पीपीएम पातळीची खते जास्त परिणामकारक असतात. ही खते जास्त प्रमाणात घेतली जातात.

पिकाच्या योग्य वाढीसाठी १८ अन्नद्रव्यांची गरज असते, पीकवाढीच्या अवस्थेनुसार शिफारशीनुसार कमी जास्त प्रमाणात प्रत्येक अन्नद्रव्य योग्य वेळी द्यावे.

मुख्य अन्नद्रव्य : नत्र, स्फुरद, पालाश

दुय्यम अन्नद्रव्य : कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, सल्फर

सूक्ष्म अन्नद्रव्य : झिंक,बोरॉन, कॉपर, फेरस, मॅंगेनीज,मॉलिब्डेनम, क्लोरिन, सिलिकॉन, निकेल

नैसर्गिक अन्नद्रव्य : कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन

हळद पिकासाठी एकरी खत व्यवस्थापन

लागवडी अगोदर शेणखत डीएपी सिंगल सुपर फॉस्फेट मॅग्नेशियम सल्फेट सूक्ष्म अन्नद्रव्ये

१० टन ५० किलो २२५ किलो २५ किलो १० किलो

लागवडीनंतर खतमात्रा

लागवडीनंतरचे दिवस एकूण दिवस किलो/एकर

युरिया अमोनियम सल्फेट १२: ६१:०० ०:०:५० १३:०: ४५

३० ते ६० ३० ३० ४५ ७.५ १५ ७.५

६१ ते ९० ३० ३० ३० ७.५ १५ ७.५

९१ ते १२० ३० ७.५ ३० ७.५ ७.५ ७.५

१२१ ते १५० ३० १५ ४५ ७.५

१५१ ते १८० ३० ६०

एकूण ८२.५ १०५ २२.५ १४२.५ ३०

टीप :

१) ६० ते १५० दिवस प्रति आठवडा ३ किलो मॅग्नेशिअम सल्फेट द्यावे.

२) दुसऱ्या ते चौथ्या महिन्यापर्यंत महिन्यातून एकदा ०.५ किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये द्यावीत.

अरुण देशमुख, ९५४५४५६९०२

(प्रमुख, कृषी विद्या विभाग, नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रा. लि., पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: ‘त्या’ शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ; कृषिमंत्री भरणे यांची विधानसभेत माहिती

Monsoon Rain: पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पावसाचा जोर

Defective Groundnut Seeds: निकृष्ट भुईमूग बियाणे बदलून मिळणार; कृषिमंत्र्यांच्या निर्देशाने शेतकऱ्यांना दिलासा

Dimbhe Dam Reservoir: डिंभे धरणक्षेत्रात ६७ मिमी पाऊस; पूर्व भागातील शेतकरी अजूनही जोरदार सरींच्या प्रतीक्षेत

Monsoon Alert: मॉन्सूनच्या पावसाला दमदार सुरुवात

SCROLL FOR NEXT